मुंबई

नेहरू जयंतीनिमित्त ‘भारतभाग्यविधाता’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन

CD

नेहरू जयंतीनिमित्त ‘भारतभाग्यविधाता’ कार्यक्रम
संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह मान्यवरांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘भारतभाग्यविधाता’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (ता. १३) दादर येथील टिळक भवनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात नेहरू यांच्या विचारांचे आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीतील त्यांच्या योगदानाचे विविध पैलू उलगडण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि माजी खासदार कुमार केतकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. नाटक व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, कवी व सामाजिक कार्यकर्ते सायमन मार्टिन यांच्यासह कला, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही सहभागी होणार आहेत.
स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत नेहरू यांनी बजावलेली भूमिका, औद्योगिक आणि आर्थिक विकासाबाबतची त्यांची दूरदृष्टी तसेच शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान आणि रोजगारनिर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांवर या कार्यक्रमात विचारमंथन होणार आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मतेबाबत नेहरू यांची भूमिका आणि आजच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीत त्यांच्या विचारांचे महत्त्व यावरही चर्चा केली जाणार आहे.
-----------
पुस्तक प्रदर्शन, नाट्य सादरीकरण
कार्यक्रमानिमित्त नेहरू यांच्या विचारांवरील पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री, त्यांच्या जीवनकार्यावरील पोस्टर प्रदर्शन आणि विशेष प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘भारत एक खोज’मधील निवडक भागांचे अभिवाचन आणि विशेष नाट्य सादरीकरणही होणार आहे. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fertilizer Subsidy Hike : रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खतांच्या अनुदानात तब्बल ६४% वाढ, DAP ची गोणी कितीला मिळणार?

Oxford Naga Remains : १०० वर्षांनंतर पूर्वज परतले! इंग्रजांनी पळवून नेलेल्या ३९ मानवी कवट्या अखेर भारताला परत; लंडनमध्ये ऐतिहासिक सोहळा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! रत्नागिरी-रायगडमधील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

IND A vs ENG A: पुणे-मुंबईत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे अन् टी२० सामन्यांसाठी भारतीय महिला अ संघाची घोषणा; अनुष्का शर्मा कर्णधार

SCROLL FOR NEXT