मुंबई

राष्ट्रवादीचे २० आमदार कधीही पक्ष सोडतील : संजय राऊत

CD

राष्ट्रवादीचे २० आमदार कधीही पक्ष सोडतील : संजय राऊत

मुंबई, ता. ११ ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे २० ते २२ आमदार पक्षातून बाहेर पडू शकतात, असा दावा आज केला.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची केवळ सहज भेट घेण्यासाठी जात नव्हते. या भेटींमागे आणखी काही घडामोडी असल्याचेही त्यांनी सूचित केले. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सत्ताधारी भाजपप्रणीत महायुती आघाडीत केवळ ‘गुलाम’ बनून राहिले आहेत, असा दावाही त्यांनी केला. ‘‘सुनेत्रा पवार यांच्या पक्षाचे २० ते २२ आमदार कधीही पक्षातून बाहेर पडू शकतात. त्यांनी आपल्या मूळ पक्षात (शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये) परतण्याचा निर्णय घेतला, तर त्याला विलीनीकरण म्हणता येणार नाही. अन्यथा, निवडणुकीपूर्वी ते अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करू शकतात,’’ असे राऊत यांनी पुढे सांगितले. २८८ सदस्यसंख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भाजपशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होऊ शकत नाही, असे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, शरद पवार यांच्या पक्षाला ही अट लागू होत नाही.
...
‘गोकुळ’च्या घडामोडी लोकशाहीसाठी घातक!
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, कोल्हापूरस्थित या दूध उत्पादक सहकारी संस्थेत घडणाऱ्या घडामोडी लोकशाहीसाठी घातक आहेत. या संपूर्ण प्रकरणात महायुतीच्या मंत्र्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले, असे राऊत म्हणाले. तसेच ‘‘राजकारणात नेहमीच सर्व दिवस सारखे नसतात,’’ असा इशाराही त्यांनी दिला. गोकुळ दूध संघाच्या बाबतीत आपण कोणत्याही व्यक्तीला नव्हे, तर दूध संघाला पाठिंबा देत असल्याच्या फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, असे असते तर त्यांनी सरकारी नामनिर्देशित चार संचालकांची नियुक्ती करण्यासाठी कायदा केला नसता.
...
अजितदादांचा मृत्यू हा घातपातच ः उमेश पाटील
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील यांनी अजितदादांचा मृत्यू हा अपघात नसून घातपात असावा, असा दावा केला आहे. गेल्या २०-२५ वर्षांतील सहवासाच्या अनुभवातून आणि घडामोडींवरून आपले हे ‘गट फीलिंग’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणाचा सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडून योग्य व्यासपीठावर पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी यापूर्वी या दुर्घटनेवरून सुनील तटकरे यांच्या चौकशीची मागणी केली होती. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, दुर्घटनेशी संबंधित अनेक तांत्रिक बाबी असून, तपास यंत्रणांचे अहवाल समोर आल्यावरच यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरेल, असे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oxford Naga Remains : १०० वर्षांनंतर पूर्वज परतले! इंग्रजांनी पळवून नेलेल्या ३९ मानवी कवट्या अखेर भारताला परत; लंडनमध्ये ऐतिहासिक सोहळा!

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! रत्नागिरी-रायगडमधील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरमध्ये ऊसदराचा तिढा कायम; पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षतेखाली झालेली दुसरी बैठकही निष्फळ

IND A vs ENG A: पुणे-मुंबईत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे अन् टी२० सामन्यांसाठी भारतीय महिला अ संघाची घोषणा; अनुष्का शर्मा कर्णधार

Stories from The Forgotten War : ७४ वर्षांनंतर कोरियन युद्धातील अमेरिकन सैनिक दक्षिण कोरियात परतले; शहीद मित्रांच्या आठवणींनी दाटला कंठ!

SCROLL FOR NEXT