मुंबई

मुंबई विमानतळाची आंतरराष्ट्रीय सेवा कायम

CD

मुंबई विमानतळाची आंतरराष्ट्रीय सेवा कायम
टर्मिनल १च्या पुनर्विकासासाठी ११ कंपन्यांची सेवा नवी मुंबईतून
मुंबई, ता. ११ (पीटीआय) : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (सीएसएमआयए) जुन्या टर्मिनल १च्या जागी नवे टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या कामामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर मोठा परिणाम होणार नाही. सुमारे ९१ टक्के आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक मुंबई विमानतळावरूनच सुरू राहणार आहे. ५० पैकी ३९ विमान कंपन्यांची सर्व उड्डाणे टर्मिनल २मधून होतील. उर्वरित ११ कंपन्यांची काही उड्डाणे मार्च २०२७च्या अखेरपासून नवी मुंबई विमानतळावर (एनएमआयए) हलविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई विमानतळावरून दरवर्षी सुमारे पाच कोटी ५० लाख प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी सुमारे ५० लाख प्रवाशांची वाहतूक नवी मुंबई विमानतळावर हलविण्यात येईल. उर्वरित पाच कोटी प्रवाशांची ये-जा मुंबई विमानतळावरूनच सुरू राहील. नवी मुंबई विमानतळावरून दररोज सुमारे १६ आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतील; मात्र एमिरेट्स, एतिहाद, सिंगापूर एअरलाइन्स, ब्रिटिश एअरवेज, लुफ्थांसा आणि एअर फ्रान्स या कंपन्यांची सेवा मुंबई विमानतळावरूनच सुरू राहणार आहे.
....
नवे टर्मिनल २०२९ मध्ये सुरू होणार
मुंबई विमानतळावरील टर्मिनल १ची इमारत १९६४ मध्ये बांधण्यात आली होती. २०१७ आणि २०२४ मध्ये केलेल्या तपासणीत इमारतीच्या सुरक्षिततेबाबत काही अडचणी आढळल्या होत्या. त्यामुळे या इमारतीच्या जागी नवे टर्मिनल बांधण्यात येणार आहे. नव्या टर्मिनलमधून दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना सेवा देता येईल. सध्या या टर्मिनलची क्षमता दीड कोटी प्रवाशांची आहे. मार्च २०२९ पर्यंत नव्या टर्मिनलचे काम पूर्ण करून ते प्रवाशांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fertilizer Subsidy Hike : रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खतांच्या अनुदानात तब्बल ६४% वाढ, DAP ची गोणी कितीला मिळणार?

Oxford Naga Remains : १०० वर्षांनंतर पूर्वज परतले! इंग्रजांनी पळवून नेलेल्या ३९ मानवी कवट्या अखेर भारताला परत; लंडनमध्ये ऐतिहासिक सोहळा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! रत्नागिरी-रायगडमधील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

IND A vs ENG A: पुणे-मुंबईत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे अन् टी२० सामन्यांसाठी भारतीय महिला अ संघाची घोषणा; अनुष्का शर्मा कर्णधार

SCROLL FOR NEXT