मुंबई

मेट्रो पुलाखाली कोंडी

CD

मेट्रो पुलाखाली कोंडी
५० अपघातग्रस्त रिक्षांमुळे वाहतुकीला अडथळा; गटाराचे पाणी रस्त्यावर
जोगेश्‍वरी, ता. १२ (बातमीदार) : अंधेरी पूर्व येथील मेट्रो पुलाखाली तसेच अंधेरी पोलिस ठाण्यालगतच्या वळणावर गेल्या अनेक महिन्यांपासून गटाराचे दूषित पाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यातच सुमारे ४० ते ५० अपघातग्रस्त रिक्षा रस्त्याच्या कडेला उभ्या करून ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या अपघातग्रस्त रिक्षांनी रस्त्याचा अर्ध्याहून अधिक भाग व्यापला आहे. त्यामुळे वाहनचालकांना अरुंद जागेतून मार्ग काढावा लागत असून, वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी फुटपाथ नसल्याने नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागते. त्यात रिक्षांमुळे चालण्यासाठीही पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.
अंधेरी रेल्वे स्थानकाकडे जाणारा आणि पोलिस ठाण्यालगतचा हा मार्ग दिवस-रात्र वर्दळीचा असून, दररोज हजारो नागरिक येथून प्रवास करतात. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून अपघातग्रस्त रिक्षा हटवाव्यात, गटाराच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा आणि परिसराची स्वच्छता करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

गटाराचे पाणी रस्त्यावर
या रिक्षांचा काही दुकानदार आणि रहिवाशांकडून कचराकुंडीसारखा वापर केला जात आहे. रिक्षांमध्ये कचरा साचल्याने दुर्गंधीत आणखी भर पडत आहे. दुसरीकडे, अनेक महिन्यांपासून गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना नाकाला रुमाल लावून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे परिसरातील स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग! आज महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT