मुंबई

सूर्या नदीवरील बंधाऱ्यांमुळे जलसाठ्यात वाढ होणार

CD

सूर्या नदीचे पाणी उन्हाळ्यासाठी राखीव
कमी पावसामुळे पाटबंधारे विभागाचे जलनियोजन

कासा, ता. १२ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने सूर्या नदीवरील घोळ, आंबिवली, उर्से आणि चिंचारे येथील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवून जलसाठा वाढविण्याचे नियोजन केले आहे. यंदा धामणी धरणातून कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडले जाणार नसल्याने उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात येणार आहे. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी जलसाठा राखून ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुमारे चार वर्षांपूर्वी ५० कोटी रुपये खर्चून घोळ, आंबिवली, उर्से आणि चिंचारे येथे कोकण पद्धतीचे बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यांमुळे सूर्या नदीतून समुद्राकडे वाहून जाणारे पाणी अडवून स्थानिक पातळीवर साठवणे शक्य झाले आहे. त्याचा नदीकाठच्या गावांना शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होत आहे.

या बंधाऱ्यांमुळे कालव्यांचे पाणी न पोहोचणाऱ्या भागांतील शेतकऱ्यांना उन्हाळी भातशेती आणि पालेभाज्यांची लागवड करणे शक्य झाले होते, मात्र यंदा कमी पावसामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे सिंचनासाठी पाणी न सोडता बंधाऱ्यांमधील जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे नियोजन पाटबंधारे विभाग करीत आहे, अशी माहिती विभागाचे अधिकारी सचिन पाटील यांनी दिली.

पाण्याचा जपून वापरण्याचे आवाहन
उन्हाळ्यात कासा परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावते. अशा परिस्थितीत घोळ येथील बंधाऱ्यातील पाणीसाठा नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करून अपव्यय टाळावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शैलेश वाघ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ वाचणार, अटल सेतू-एक्स्प्रेसदरम्यानचे ६७ टक्के काम पूर्ण

India Inflation: भारतात महागाईचा कहर, ऑक्टोबर मध्ये गाठला दोन वर्षातील उच्चांक; दर RBI च्या मर्यादेपलीकडे

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग! आज महत्त्वाच्या घडामोडी

Winter Special Broccoli Soup: थंडीच्या दिवसांत शरीराला द्या पोषणाची साथ! बनवा गरमागरम ब्रोकली सूप आणि क्रीमी टोस्ट

SCROLL FOR NEXT