अंबरनाथ, ता. १२ (वार्ताहर) : घरासमोर मध्यरात्रीच्या वेळी फटाके फोडण्यास मनाई केल्याचा राग मनात धरून टोळक्याने एका दाम्पत्यावर हल्ला केल्याची घटना अंबरनाथ पूर्वेतील कानसई सेक्शन परिसरात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात प्रतिश इंगळे याच्यासह अन्य संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शर्मिष्ठा सुनुपम दत्ता (वय २८) यांच्या घरासमोर मंगळवारी (ता. १०) मध्यरात्री १२.१० वाजण्याच्या सुमारास प्रतिश इंगळे हा फटाके फोडत होता. घराच्या दिशेने फटाके फोडले जात असल्याने शर्मिष्ठा यांचे पती श्रेयस पाटील यांनी त्याला येथे फटाके फोडू नकोस, असे सांगितले. याच गोष्टीचा राग आल्याने प्रतिशने बंटी वायले, यश गुरव आणि अन्य तीन ते चार जणांना सोबत घेऊन पाटील यांच्याशी वाद घातला. या वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. संशयितांनी शिवीगाळ करत श्रेयस यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या घराजवळ येऊन दमदाटी करत शर्ट फाडला आणि गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. पतीला मारहाण होत असल्याचे पाहून शर्मिष्ठा आणि त्यांच्या सासू यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही धक्काबुक्की करत त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.