मुंबई

चार महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : माजिवडा येथील उड्डाणपुलाखाली आई-वडिलांच्या देखरेखीखाली असलेल्या अवघ्या चार महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ७) उघडकीस आली. या घटनेनंतर चितळसर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत अवघ्या दहा तासांत बाळाचा शोध घेतला. कळवा येथील सायबानगर परिसरात एका ५२ वर्षीय महिलेच्या ताब्यात ही चिमुकली आढळली. पोलिसांनी तिची सुखरूप सुटका करून आईच्या स्वाधीन केले. वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी ही माहिती दिली.
छोगालाल वागरिया (वय २७) हे माजिवडा उड्डाणपुलाखाली पेट्रोल पंपासमोर वास्तव्यास असून, लाडू विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी पहाटे पाच ते सातच्या दरम्यान त्यांच्या चार महिन्यांच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने त्यांच्या संमतीशिवाय पळवून नेले. बराच शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने त्यांनी चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांच्या सूचनेनुसार परिमंडळ पाचमधील विविध पोलिस ठाण्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांची पाच स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. घटनास्थळ आणि परिसरातील गोपनीय माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे कापूरबावडी, ठाणे रेल्वे स्थानक आणि कळवा परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर कळव्यातील सायबा नगर परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ राहणाऱ्या कमल मोरे (वय ५२) या महिलेच्या ताब्यात चिमुकली आढळली. पोलिसांनी बाळाची सुखरूप सुटका करून त्याला आईच्या स्वाधीन केले. अपहरणानंतर अवघ्या दहा तासांत चिमुकलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.

ही कारवाई पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलिस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलिस आयुक्त अशोक दुधे, पोलिस उपायुक्त प्रशांत कदम आणि सहायक पोलिस आयुक्त ममता डिसोजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वरुडे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अनुजा घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्यासह तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी या मोहिमेत सहभाग घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Unknown UTI Symptoms: लघवी करताना जळजळ होत नाही, तरीही असू शकते UTI! शरीरातील 'हे' ६ बदल वेळीच ओळखा

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण शक्य नाही; सतेज पाटलांची सडेतोड भूमिका

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT