मुंबई

माणगावात नागरी सुविधांचा बोजवारा

CD

माणगावात नागरी सुविधांचा बोजवारा
पथदीप बंद, स्वच्छतेचा प्रश्न गंभीर; अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक हैराण
माणगाव, ता. १२ (वार्ताहर) : दिवाळीच्या सणानिमित्त सर्वत्र रोषणाईचा उत्साह असताना माणगाव नगरपंचायत हद्दीत मात्र मूलभूत नागरी सुविधांचा अभाव जाणवत आहे. शहरातील अनेक भागांतील पथदीप बंद असून स्वच्छतेचे प्रश्नही कायम आहेत. त्यातच पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सणासुदीच्या काळातही या समस्यांवर उपाय होत नसल्याने नगरपंचायत प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे.
माणगाव शहरातील रस्ते, अंतर्गत गल्ल्या, चौक आणि नाक्यांवरील पथदीप बंद असल्याने रात्री अंधार पसरत आहे. सायंकाळी ६.४० वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले पथदीप तीन वेळा बंद-चालू झाल्यानंतर पुन्हा बंद पडले. रात्री ११.३० वाजेपर्यंत ते सुरू झाले नव्हते. दसऱ्याच्या काळातही अशीच परिस्थिती होती. नागरिकांनी घरांसमोर केलेल्या विद्युत रोषणाईमुळे काही भागांत रस्त्यांवर प्रकाश पडत असला, तरी सार्वजनिक प्रकाशव्यवस्थेचा प्रश्न कायम आहे.
शहरालगतच्या खांदाड गावातही पथदीपांची स्थिती गंभीर आहे. पूर्वी ३५ टक्के पथदीप बंद होते; आता सुमारे ८५ टक्के पथदीप बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे.

करवसुली नियमित, सुविधा अनियमित
नगर पंचायतीकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. स्वच्छतेबाबतही विविध भागांत तक्रारी आहेत. त्यातच पाणीपुरवठा बाधित होण्याचे संदेश प्रसारित होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आहे. दुसरीकडे घरपट्टी, पाणीपट्टी आणि पथदीप करांची वसुली नियमित सुरू आहे. त्यामुळे कर भरूनही अपेक्षित सुविधा मिळत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे
बंद पथदीप दुरुस्त करणे, नियमित पाणीपुरवठा करणे, स्वच्छता मोहीम राबविणे आणि पाणीपुरवठ्याबाबत अधिकृत माहिती देणे आवश्यक आहे. सणांच्या काळात नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी त्रास सहन करावा लागू नये, अशी अपेक्षा माणगावकरांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईला उडवणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच, पुन्हा बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Novaya Gazeta: ६ पत्रकारांची हत्या, ३३ वर्षांचा संघर्ष; रशियातील शेवटचे मोठे स्वतंत्र वृत्तपत्रही बंद

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! राज्यात अवघ्या ७ महिन्यांत रस्ते अपघातात ९,१९५ जणांचा मृत्यू

Pune Cyber Crime: बनावट अटक वॉरंट, व्हिडिओ कॉल आणि धमक्या; पुण्यातील वृद्ध महिलेची 32 लाखांची फसवणूक

विनयभंगानंतर तरुणीला लोकलखाली ढकलल्याचा आरोप; नायगाव स्थानकातील धक्कादायक घटना|Naigaon | Mumbai news

SCROLL FOR NEXT