मुंबई

जल्लोषाला आगींचा कहर

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीने उजळलेल्या दिवाळीत ठाणे शहर मात्र आगीच्या घटनांनी होरपळले. यंदाच्या दिवाळीत शहरात तब्बल ६१ आगींच्या घटनांची नोंद ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेत झाली आहे. गेल्या वर्षीच्या २५ घटनांच्या तुलनेत यंदा तब्बल १४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक घटनांचा विक्रम यंदा नोंदविण्यात आला आहे. २०१८ मधील ५३ घटनांचा उच्चांकही मागे पडल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

दिवाळीच्या काळात फटाक्यांची आतषबाजी, रॉकेट्स आणि विद्युत रोषणाईमुळे आगीच्या दुर्घटनांचा धोका वाढतो, मात्र यंदा या घटनांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यंदा आगींच्या घटनांनी थेट ६१ चा आकडा गाठला. गतवर्षीच्या तुलनेत ३६ घटनांची वाढ झाली आहे. म्हणजेच दरवर्षीच्या तुलनेत यंदा आगींच्या घटनांमध्ये तब्बल १४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करताना सुरक्षिततेकडे होणारे दुर्लक्ष किती महागात पडू शकते, याची जाणीव या आकडेवारीने करून दिली आहे.


यंदा दिवाळीत आगीच्या ६१ घटनांची नोंद झाली आहे, मात्र या सर्व घटना फटाक्यांमुळेच घडल्या, असे म्हणता येणार नाही. घटनांची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले. काही ठिकाणी किरकोळ दुखापती झाल्या असल्या तरी जीवितहानी झाली नाही, मात्र वित्तहानी झाली आहे.
- यासिन तडवी, अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे महापालिका

आगीच्या घटनांचा क्रम
तारीख सण घटना
५ वसुबारस ३
६ धनत्रयोदशी ६
७ ४
८ लक्ष्मीपूजन ८
९ १५
१० दिवाळी पाडवा ११
११ भाऊबीज १४

वर्ष घटना
२०१६ ३१
२०१७ २०
२०१८ ५३
२०१९ २१
२०२० १६
२०२१ ३३
२०२२ २७
२०२३ ४७
२०२४ ३३
२०२५ २५
२०२६ ६१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

'बेसन लाडू to रसमलाई' वनिता खरातने दाखवली डाएटची कमाल; ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू कमाल आहेस!'

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मराठा बांधवांसाठी उपलब्ध करून दिल्या ३ हेल्पलाईन

Beed Crime: बीडमध्ये फटाका फेकण्याच्या वादातून चाकूहल्ला; पाच जण गंभीर जखमी, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT