मुंबई

‘रील’च्या नादात तरुण गंभीर जखमी

CD

पालघर, ता. १२ : दिवाळीत समाजमाध्यमांवर रील बनवण्याच्या नादात सोमवारी (ता. ९) २१ वर्षीय तरुणाच्या हातात स्काय शॉट फटाका फुटून तो गंभीर जखमी झाला. या दुर्घटनेत त्याच्या हाताला दुखापत झाली असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान तब्बल ७२ टाके घातले आहेत.

वसई पूर्वेच्या मधुबन इमारत परिसरात विनीत कुमार हा कामाचा ठेकेदार म्हणून काम करतो. समाजमाध्यमासाठी काहीतरी वेगळा व्हिडिओ बनवण्याच्या प्रयत्नात त्याने हवेत उडवला जाणारा स्काय शॉट फटाका हातात धरून पेटवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो हवेत उडण्याऐवजी त्याच्याच हातात फुटला. त्यामुळे त्याचा हात गंभीररीत्या भाजला असून, मोठी दुखापत झाली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला दोन रुग्णालयांनी त्याला दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानंतर त्याला वसई पश्चिमेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सुमारे पाच तास शस्त्रक्रिया करून त्याच्या हातावर उपचार केले. या शस्त्रक्रियेदरम्यान त्याला ७२ टाके घालण्यात आले.

प्रकृती स्थिर
प्लॅस्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या विनीतची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉ. प्रवीण थोरात यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ वाचणार, अटल सेतू-एक्स्प्रेसदरम्यानचे ६७ टक्के काम पूर्ण

India Inflation: भारतात महागाईचा कहर, ऑक्टोबर मध्ये गाठला दोन वर्षातील उच्चांक; दर RBI च्या मर्यादेपलीकडे

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! राज्यात अवघ्या ७ महिन्यांत रस्ते अपघातात ९,१९५ जणांचा मृत्यू

Winter Special Broccoli Soup: थंडीच्या दिवसांत शरीराला द्या पोषणाची साथ! बनवा गरमागरम ब्रोकली सूप आणि क्रीमी टोस्ट

PM Narendra Modi: 'मी कधीकाळी पत्रकारांसाठी खुर्च्याही लावायचो!' पंतप्रधान मोदींनी सांगितले फॅक्सपासून इन्स्टाग्राम रील्सपर्यंतचे भन्नाट किस्से

SCROLL FOR NEXT