मुंबई

पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण; राम पूर्णेकर यांचा साखळी उपोषणाचा इशारा !

CD

पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवे वळण
राम पूर्णेकर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाचा इशार

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : शिवसेना ठाकरे गटाचे माजी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील तपासाला ४२ दिवस उलटूनही ठोस निष्कर्ष समोर आलेला नसल्याचा आरोप पूर्णेकर यांचे सुपुत्र राम पूर्णेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या दोन दिवसांत तपासाबाबत प्रश्न मार्गी न लागल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच, काही महत्त्वाचे पुरावे माध्यमांसमोर आणणार असल्याचा दावाही राम पूर्णेकर यांनी गुरुवारी (ता. १२) प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
ठाणे खंडणी विरोधी पथक कार्यालयात राम पूर्णेकर यांनी गुरुवारी तपास अधिकारी तथा वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पूर्णेकर यांनी तपासासंदर्भात काही पुरावे विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सादर केले आहेत. पोलिसांकडून त्यांची पडताळणी केली जाणार असून, त्यानंतर दोन ते तीन दिवसांत संबंधित माहिती माध्यमांसमोर मांडणार असल्याचे राम पूर्णेकर यांनी सांगितले. यापूर्वी दिलेला व्हिडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
------------
संरक्षणाची मागणी करण्यामागे षड्‍यंत्र
दरम्यान, माजी महापौर तथा नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या विरोधात अटकेसाठी पुरावे असल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी या वेळी केला. या प्रकरणात सहा जणांची नावे समोर आणण्याची मागणीही त्यांनी केली. मीनाक्षी यांनी तीन तारखेला पोलिस आयुक्तांची भेट घेऊन स्वतःसह सहा जणांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी केल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. अचानक संरक्षणाची मागणी करण्यामागे षड्‍यंत्र असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. तर माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाल्यास मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे जबाबदार असतील, असा गंभीर आरोपही राम पूर्णेकर यांनी केला. संबंधित सहापैकी दोघांना धमकावण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

Pune News : पुणे महापालिका बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता सतेज पाटलांनी फेटाळली; "मला १०० टक्के खात्री आहे, विलीनीकरण होणार नाही"

SCROLL FOR NEXT