मुंबई

स्वच्छता पुरस्कार नागरिकांना समर्पित; वनमंत्री गणेश नाईक

CD

स्वच्छता पुरस्कार नागरिकांना समर्पित ः वनमंत्री गणेश नाईक
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १२ : केंद्र सरकारच्या शहरी गृहनिर्माण आणि विकास मंत्रालयामार्फत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात नवी मुंबईने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल वनमंत्री गणेश नाईक यांनी आनंद व्यक्त केला असून, स्वच्छतेचा हा प्रथम क्रमांक सातत्याने टिकवून ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केले. तसेच, हा पुरस्कार नवी मुंबईच्या जागरूक नागरिकांना समर्पित करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल शहरातील लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन, अहोरात्र शहराची स्वच्छता राखणारे सफाई कर्मचारी आणि स्वच्छतेत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व नवी मुंबईकरांचे गणेश नाईक यांनी विशेष अभिनंदन केले. या वेळी नाईक म्हणाले की, १९९५ पासून नवी मुंबईच्या जनतेने महापालिकेची सत्ता मोठ्या विश्वासाने आमच्याकडे सोपवली आहे. संपूर्ण देशात स्वच्छतेमध्ये तिसऱ्या क्रमांकावरून नवी मुंबईने थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे, ही निश्चितच आनंदाची व अभिमानाची बाब असून, हे गेल्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे फळ आहे. यापुढेही पाणीपुरवठा, शाळा, उद्याने, रुग्णालये, बगीचे, मलनिस्सारण व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन आणि दळणवळणाच्या सोयी या सर्वच क्षेत्रांत नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. शहरातील भविष्यातील विकासकामांबाबत माहिती देताना नाईक यांनी सांगितले की, शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी विशेष नियोजन सुरू असून, विक्रोळी ते कोपरखैरणे उन्नत पुलाच्या कामासंदर्भात लवकरच एमएमआरडीएसोबत बैठक घेण्यात येणार आहे. सांस्कृतिक विकासाचा भाग म्हणून वाशी आणि ऐरोली येथे नाट्यगृहांची उभारणी झाली असून, त्याच धर्तीवर आगामी काळात घणसोली आणि नेरूळ येथेही सुसज्ज नाट्यगृहे बांधण्यात येणार आहेत.


वाढीव लोकसंख्येच्या भाराबाबत सावधगिरी
शहराच्या नियोजनावर भाष्य करताना त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे महत्त्व अधोरेखित केले. नवी मुंबईची लोकसंख्या जेवढी मर्यादित राहील, तेवढी येथील नागरी व्यवस्था उत्तम राहील. वाढीव लोकसंख्येचा थेट भार येथील पायाभूत सोयीसुविधांवर पडेल. त्यामुळे जोपर्यंत इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार होत नाही, तोपर्यंत शहरामध्ये अर्बन रिन्यूअल स्कीमला (क्लस्टर) आमचा विरोध कायम असेल, असेही वनमंत्री गणेश नाईक यांनी या वेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

'बेसन लाडू to रसमलाई' वनिता खरातने दाखवली डाएटची कमाल; ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू कमाल आहेस!'

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मराठा बांधवांसाठी उपलब्ध करून दिल्या ३ हेल्पलाईन

Beed Crime: बीडमध्ये फटाका फेकण्याच्या वादातून चाकूहल्ला; पाच जण गंभीर जखमी, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT