मुंबई

मुलींच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणावर शिक्षण विभागाचा भर

CD

मुंबई, ता. १२ : शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलींना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळांमध्ये दिवाळीच्या सुट्टीनंतर मुलींच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या कार्यक्रमावर शालेय शिक्षण विभागाकडून विशेष लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. यासाठी शिक्षण संचालकांकडून मुंबईसह राज्यातील सर्वच शाळांना आदेश जारी केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलींना कराटे आदी प्रशिक्षण देण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या निधीची तरतूद केली जाते; परंतु मागील काही वर्षांमध्ये यासंदर्भात योग्य अंमलबजावणी झाली नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे, तर दुसरीकडे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींमध्येदेखील अशीच अवस्था असून, त्यांनादेखील अशा प्रकारच्या प्रशिक्षणापासून दूर राहावे लागल्यास असल्याने मुलींच्या स्वरक्षण आणि इतर प्रशिक्षणाचा प्रश्न पुन्हा उभा राहिला असल्याचे कॉप्स संघटनेचे म्हणणे आहे.

शाळांमध्येही स्वतंत्र योजना
मुलींच्या सुरक्षिततेसाठी शालेय शिक्षण विभागामार्फतही कराटे आदी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची तरतूद असून, त्यासाठी स्वतंत्र योजना आहे, मात्र ही योजना शाळांमध्ये प्रभावीपणे राबविली जात नसल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेचे नेते अमर एकाड यांनी केला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीनंतर मुंबईतील शाळांमध्ये मुलींच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यावर शिक्षण विभागाने भर देण्याची आवश्यकता आहे.

मुंबईत प्रशिक्षण आवश्यक
मुंबईसारख्या महानगरात मोठ्या संख्येने मुली शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे केवळ काही निवडक शाळांपुरते प्रशिक्षण मर्यादित न ठेवता सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने व्यापक स्वरूपात कराटे, ज्युदो आणि अन्य स्वसंरक्षण प्रशिक्षण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. प्रत्येक शाळेत प्रशिक्षित प्रशिक्षकांची नियुक्ती, नियमित प्रशिक्षण सत्रे आणि विद्यार्थिनींच्या सहभागाची नोंद ठेवण्याची व्यवस्था केल्यास या उपक्रमाला अधिक प्रभावी स्वरूप देता येईल. यासाठी शिक्षण विभागाकडून पावले उचलली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

'बेसन लाडू to रसमलाई' वनिता खरातने दाखवली डाएटची कमाल; ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू कमाल आहेस!'

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मराठा बांधवांसाठी उपलब्ध करून दिल्या ३ हेल्पलाईन

Beed Crime: बीडमध्ये फटाका फेकण्याच्या वादातून चाकूहल्ला; पाच जण गंभीर जखमी, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT