मुंबई

डॉक्टरांच्या बदल्यांचे ‘ऑपरेशन’

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : ठाणे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेत वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर ठाण मांडून बसलेल्या डॉक्टरांना आता दुसऱ्या ठिकाणी जावे लागण्याची चिन्हे आहेत. आरोग्य विभागातील कामकाजात फेरबदल करून प्रशासकीय पकड मजबूत करण्यासाठी प्रशासनाने डॉक्टरांच्या बदल्यांची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार रोटेशन पद्धतीने बदल्या करण्याचे विचारधीन असून अतिरिक्त आयुक्त मेजर डॉ. नितीन राठोड यांनी संबंधित डॉक्टरांच्या नियुक्तीचा कालावधी आणि कामकाजाचा तपशील मागविला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी तळ ठोकून बसणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.

ठाणे आरोग्य व्यवस्थेचा विस्तार छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, शहरातील ३३ आरोग्य केंद्रे आणि मुख्यालयातील आरोग्य विभागापर्यंत आहे. या सर्व ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, काही डॉक्टरांनी एकाच ठिकाणी पाच ते सात वर्षे, तर काहींनी तब्बल १० ते १५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे नियमित बदलीच्या प्रशासकीय धोरणाचे पालन होते की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासकीय कामकाजात तीन वर्षांनंतर कर्मचाऱ्यांच्या बदलीचा विचार केला जातो. मात्र, आरोग्य विभागात या निकषाला अपवाद ठरणारे अनेक डॉक्टर असल्याचे समोर आले आहे. मुख्यालयातील काही वैद्यकीय अधिकारीही पाच ते दहा वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे. कळवा रुग्णालय आणि विविध आरोग्य केंद्रांमध्येही दीर्घकाळ एकाच ठिकाणी नियुक्ती असलेले डॉक्टर आहेत.
एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्याने संबंधित डॉक्टरांना तेथील यंत्रणा आणि कामकाजाची सवय होते. मात्र, दीर्घकाळ एकाच पदावर राहिल्याने प्रशासकीय नियंत्रण कमकुवत होण्याची आणि विशिष्ट ठिकाणी मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डॉक्टरांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी देऊन आरोग्य यंत्रणेत कार्यपद्धतीचा समतोल साधण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

सविस्तर तपशील मागविला
१. कोणते डॉक्टर किती वर्षांपासून कोणत्या रुग्णालयात, आरोग्य केंद्रात अथवा मुख्यालयात कार्यरत आहे, याचा सविस्तर तपशील अतिरिक्त आयुक्त डॉ. नितीन राठोड यांनी आरोग्य विभागाकडून मागविला आहे.
२. या माहितीची छाननी झाल्यानंतर बदल्यांचे नियोजन केले जाणार आहे.
३. तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी असलेल्या डॉक्टरांचा प्राधान्याने विचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात मोठी खांदेपालट होण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

'बेसन लाडू to रसमलाई' वनिता खरातने दाखवली डाएटची कमाल; ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू कमाल आहेस!'

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मराठा बांधवांसाठी उपलब्ध करून दिल्या ३ हेल्पलाईन

Beed Crime: बीडमध्ये फटाका फेकण्याच्या वादातून चाकूहल्ला; पाच जण गंभीर जखमी, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT