मुंबई

मुंबई-पुणे मार्गावर बसची अनेक वाहनांना धडक

CD

मुंबई-पुणे मार्गावर बसची
अनेक वाहनांना धडक
दुचाकीस्वाराचा मृत्यू; १२ जण जखमी
खालापूर, ता. १२ : पंढरपूरला भाविकांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसचे गुरुवारी दुपारी खालापूरजवळ जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ब्रेक निकामी झाले. या भरधाव बसने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिल्याने रिक्षाचालक, दुचाकीस्वार, पादचारी आणि प्रवाशांसह १३ जण जखमी झाले. यातील दुचाकीस्वार प्रीतम वाघमारे (३०, रा. खालापूर) यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. अन्य जखमींवर खाेपाेली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरत येथून सुमारे ५० भाविकांना घेऊन अपघातग्रस्त खासगी बस पंढरपूरच्या दिशेने चालली होती. शिळफाटा येथे पोहोचताच बसचे ब्रेक निकामी झाले. या भरधाव बसने पुढे असलेल्या दोन पिकअप, दोन रिक्षा आणि पाच ते सहा दुचाकींना जोरदार धडक दिली. या धडकेत वाहनांचे मोठे नुकसान झाले, तर रिक्षांमधील प्रवासी, दुचाकीस्वार आणि पादचारी जखमी झाले. जखमींमध्ये पादचाऱ्यांचा समावेश जास्त आहे. खोपोली पोलिस, हेल्प फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी वाघमारे यांना पुढील उपचारांसाठी कळंबोली येथे हलविण्यात आले; मात्र त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
---
जखमींची नावे
ईषा जाधव (वय २२), प्रफुल्ल ढवाळकर (३८), संदीप मुकणे (३२), विपुल पाथ्रोडकर (२९), सुहास भालेराव (३५), स्वप्नील पवार (३६), सोमनाथ पवार (३६), वरद देशमुख (१३), कुणाल दळवी (२८), सुरेश बिरादार (३०), आनंद गोसावी (३६) आणि अश्विनी बैलमारे अशी जखमींची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhosari Purandar Airport : भोसरीतून थेट पुरंदर विमानतळापर्यंत भुयारी मार्गाची योजना; ‘पाताळ लोक’ प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने उचलले पुढचे पाऊल

Kimberly Powell: कोण आहेत एनव्हिडियाच्या सीईओची 'विकेट' घेणाऱ्या किंबर्ली पॉवेल? इंटर्न ते थेट कंपनीच्या उपाध्यक्षा

Nvidia CEO Exit: ३३ वर्षांच्या प्रवासाला २ अफेअर्समुळे 'ब्रेक'! जगातील बलाढ्य कंपनीच्या सीईओचा तडकाफडकी राजीनामा; एआय जगताला हादरा

Khopoli Bus Accident : बाजारपेठेत अर्धा किलोमीटर मृत्यूचा थरार! अनियंत्रित बसने अनेक वाहनांना उडवले; एका तरुणाचा करुण अंत!

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

SCROLL FOR NEXT