मुंबई

सोमवारपासून पुन्हा ठाण्यात पाण्याचा ठणठणाट!

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या संकटाची झळ आता ठाणेकरांना बसू लागली आहे. उपलब्ध जलसाठा जपण्यासाठी राज्य सरकारने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याचे निर्देश दिले असून, त्यानुसार ठाणे महापालिकेने दर सोमवारी २४ तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारी (ता. १६) सकाळी ९ ते मंगळवारी (ता. १७) सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील १८ भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचे नियोजन करूनच दिवस काढावा लागणार आहे.

संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर आणि नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देत जलसाठा दीर्घकाळ पुरविण्यासाठी राज्यभर पाणीपुरवठ्यात कपात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील वितरित पाण्यात १० टक्के कपात लागू करण्यात आली आहे. या निर्णयाचा फटका घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळवा परिसराला बसणार आहे. स्टेम प्राधिकरण आणि महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून होणारा पुरवठा या कालावधीत पूर्णपणे बंद राहणार आहे.

आता दर सोमवारी पाण्याचे नियोजन
१६ नोव्हेंबरपासून सुरू होणारी ही पाणीकपात एकदाच होणार नसून, यापुढे प्रत्येक सोमवारी सकाळी ९ ते मंगळवारी सकाळी ९ या वेळेत २४ तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
----
अंबरनाथच्या पाण्याचे नियोजन आताच करा!
अंबरनाथ (वार्ताहर) : उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची दाट शक्यता असताना अंबरनाथ नगरपालिकेने आतापासूनच पर्यायी जलस्रोतांचा शोध घ्यावा, अशी मागणी नगरसेविका पल्लवी लकडे यांनी केली आहे. शहरातील वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या विहिरी आणि जलसाठ्यांचे सर्वेक्षण करून त्यांचा उपयोग पाणीटंचाईच्या काळात करावा. त्याचबरोबर टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दर निश्चिती आणि अधिकृत पाणी भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

'बेसन लाडू to रसमलाई' वनिता खरातने दाखवली डाएटची कमाल; ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू कमाल आहेस!'

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मराठा बांधवांसाठी उपलब्ध करून दिल्या ३ हेल्पलाईन

Beed Crime: बीडमध्ये फटाका फेकण्याच्या वादातून चाकूहल्ला; पाच जण गंभीर जखमी, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT