मुंबई

‘अभ्युदयनगर’साठी विकसकाला मुदतवाढ?

CD

‘अभ्युदयनगर’साठी विकसकाला मुदतवाढ?

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : काळाचौकी येथील अभ्युदयनगरचा पुनर्विकास म्हाडा बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सी ॲण्ड डीए) माध्यमातून करत आहे. त्यानुसार संबंधित विकसकाला येथील ५१ टक्के रहिवाशांची सहमती मिळवता यावी म्हणून मे महिन्यात म्हाडाने सहा महिन्यांची मुदत दिली होती. ती संपत आल्याने विकसकाने आणखी तीन महिन्यांची मुदत मिळावी म्हणून म्हाडाला विनंती केली आहे. त्याबाबत म्हाडा सकारात्मक असून, अखेरीची संधी म्हणून मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.
अभ्युदयनगरच्या पुनर्विकासासाठी मे. एम. जी. एन. ॲग्रो प्रॉपर्टीज प्रा. लि., मे. एन. एन. पी बिल्डकॉन प्रा. लि., मे. ओनेस्ट शेल्टर्स प्रा. लि. यांना संयुक्तपणे स्वीकृती पत्र दिले आहे. त्यानुसार संबंधित विकसकांनी तब्बल ४९ कोटी रुपयांची म्हाडाला बँक गॅरंटी भरली आहे. त्यामुळे पुनर्विकास प्रक्रियेतील पुढील रहिवाशांची सहमती मिळवण्याचा टप्पा सुरू असला तरी विकसकाला अद्याप ५१ टक्के रहिवाशांची सहमती मिळवणे शक्य झालेले नाही. तसेच त्याबाबतची मुदत संपत आल्याने विकसकाने म्हाडाकडे आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी म्हणून विनंती अर्ज केला असल्याची माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. एक संधी म्हणून तीन महिन्यांची मुदतवाढ मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Cancer Cure: पुढील १० वर्षांत कर्करोग इतिहासजमा होणार? अँथ्रोपिकच्या प्रमुखांची मोठी भविष्यवाणी

'बेसन लाडू to रसमलाई' वनिता खरातने दाखवली डाएटची कमाल; ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो पाहून चाहते म्हणाले, 'तू कमाल आहेस!'

Sakal Lit Fest: सकाळ लिट फेस्ट 2026चा पुण्यात दिमाखदार प्रारंभ; बानू मुश्ताक, डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News Live Update : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची शक्यता सतेज पाटलांनी फेटाळली; "मला १०० टक्के खात्री आहे, विलीनीकरण होणार नाही"

Beed Crime: बीडमध्ये फटाका फेकण्याच्या वादातून चाकूहल्ला; पाच जण गंभीर जखमी, तिघांना अटक

SCROLL FOR NEXT