सेक्टर-१९ सीमध्ये बेकायदा पार्किंगचा नागरिकांना त्रास
मालवाहू वाहनांवर कारवाईची मागणी
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) : वाशीतील सेक्टर-१९ सी परिसरात रस्त्यावर मोठी मालवाहू वाहने बेकायदा उभी केली जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या वाहनांमुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून, संबंधित वाहनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पांडुरंग गोविंद तिर्थे यांनी याबाबत तुर्भे विभाग कार्यालय, नवी मुंबई महापालिका आणि एपीएमसी वाहतूक शाखेकडे लेखी तक्रार केली आहे. ही तक्रार १२ नोव्हेंबर रोजी संबंधित कार्यालयात सादर करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, सेक्टर-१९ सी परिसरात एका बारसमोरील रस्त्यावर काही मोठी मालवाहू वाहने सातत्याने उभी केली जातात. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या परिस्थितीमुळे अपघाताची शक्यता वाढली असून, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांच्या ये-जा करण्यासही अडचण निर्माण होऊ शकते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
रस्त्यावर बेकायदा उभी करण्यात येणारी वाहने हटवून संबंधितांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी आणि परिसरातील वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तक्रारीसोबत संबंधित वाहनांची छायाचित्रेही पुरावा म्हणून जोडण्यात आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.