वैवाहिक वाद म्हणजे क्रूरता नव्हे!
भांडणातील शब्द गुन्ह्याचा आधार नाहीत; आरोपी पतीला जामीन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : पती-पत्नीमधील कौटुंबिक वादादरम्यान रागाच्या भरात पतीने पत्नीला उच्चारलेले शब्द गुन्ह्याचा आधार किंवा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कारण ठरत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नुकतेच उच्च न्यायालयाने नोंदवले आणि आरोपी पतीला जामीन मंजूर केला.
पतीने पत्नीला पुरेसा वेळ न देणे किंवा बाहेर फिरायला न नेणे, यावरून वैवाहिक क्रूरता झाल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही. तसेच रागात ‘तुला जे करायचे आहे ते कर’ असे सांगणे, हा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कारण ठरू शकत नाही, असे निरीक्षणही न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने नोंदवले अर्जदाराला जामीन मंजूर करताना नोंदवले. अशा प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आरोपीने जाणीवपूर्वक केलेली प्रत्यक्ष आणि सकारात्मक कृती असणे आवश्यक आहे, हे याप्रकरणी सुनावणीदरम्यान हे सिद्ध होत नाही, मुळात केवळ मतभेद आणि भांडणातील वक्तव्यांच्या आधारे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे स्पष्ट होत नाही, त्यासाठी आरोपीची कृती आणि आत्महत्येशी त्याचा थेट संबंध तपासणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत न्यायालयाने आरोपी जामीन मंजूर केला.
कोठडीतील चौकशीची गरज नाही
प्रकरणातील परिस्थिती आणि आरोपांचे स्वरूप लक्षात घेता पतीविरोधात मारहाण, शारीरिक हिंसाचार, शिवीगाळ किंवा पैशांची अथवा वस्तूंची मागणी केल्याचा आरोप नव्हता, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले आणि आरोपीला पोलिस कोठडीत ठेवून चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करून न्यायालयाने त्याला १५ हजार रुपयांच्या मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
प्रकरण काय?
पुण्यातील या दाम्पत्याचा विवाह जुलै २०२५ मध्ये झाला, पती कामात व्यस्त असल्यामुळे पत्नीला पुरेसा वेळ देत नव्हता तसेच तिला बाहेर फिरायला किंवा नातेवाइकांकडे घेऊन जात नसल्याचा आरोप सरकारी पक्षाने केला होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत, दरम्यान, पतीने आपले म्हणणे ऐकले नाही, तर आत्महत्या करेन, असे पत्नीने त्याला सांगितले होते. त्यावर संतप्त झालेल्या पतीने ‘तुला जे करायचे आहे ते कर’ असे म्हटले आणि तो आपल्या भावाच्या घरी निघून गेला. त्यानंतर पत्नीने आत्महत्या केली. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.