मुंबई

पाच सागरी जिल्ह्यांचा ठाण्यात एल्गार! संशयितांच्या अटकेसाठी १ किंवा २ डिसेंबरला महामोर्चा

CD

पाच सागरी जिल्ह्यांचा ठाण्यात एल्गार!
पूर्णेकर हत्येतील संशयितांच्या अटकेसाठी महामोर्चाची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रदूप पूर्णेकर हत्या प्रकरणातील तपास आणि अटकेच्या कारवाईवरून आता आंदोलनाची धग पाच सागरी जिल्ह्यांत पोहोचली आहे. हत्येला दीड महिना उलटूनही संशयितांना अटक झाली नसल्याने सागरी भूमिपुत्र महासंघाने सरकारविरोधात आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्या अटकेच्या मागणीसाठी ठाण्यात विराट मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. मोर्चानंतरही कारवाई न झाल्यास अटकेपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.
शनिवारी (ता. १४) ठाणे कोळी समाज सभागृहात पाच सागरी जिल्ह्यांतील विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. बैठकीत आंदोलनाचा आवाका वाढविणे, समाजातील अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेणे आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.
आगरी, कोळी, कराडी, कुणबी, आदिवासी आणि भंडारी समाजातील प्रतिनिधींनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याची भूमिका मांडली. शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर सहभागाचा आरोप केला आहे. यासंदर्भातील पुरावे पोलिसांना दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या प्रकरणात कारवाई व्हावी, यासाठी यापूर्वी मेणबत्ती मोर्चे, निषेध आंदोलने आणि रास्ता रोको करण्यात आले. मात्र, संशयितांना अद्याप अटक न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ७ डिसेंबरपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी ठाण्यात मोठ्या मोर्चाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
---------------------
आंदोलने करूनही शासन लक्ष देत नसल्याची खंत
दरम्यान, गावठाण, कोळीवाडे, पाडे संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. गिरीश साळगांवकर यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलने करूनही शासन लक्ष देत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून, भविष्यात अशा घटना कोणाच्याही बाबतीत घडू नयेत, यासाठी निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------
मोर्चाची तारीख अद्याप निश्‍चित झाली नसली तरी १ किंवा २ डिसेंबरचा पर्याय पुढे आला आहे. मोर्चात पाचही सागरी जिल्ह्यांतील भूमिपुत्रांसह न्यायाची अपेक्षा असलेल्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येणार आहे. ‘‘हत्या होऊन दीड महिना उलटला, तरी संशयितांवर कारवाई झालेली नाही. न्याय मिळविण्यासाठी भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. दोषींना शिक्षा होण्याबरोबरच संशयितांना अटक करून तपासाला गती देणे आवश्यक आहे,’’
- नीलेश पाटील, सरचिटणीस, सागरी भूमिपुत्र महासंघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Asia Cup Final: पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचला; आपला भारत आशियाचा राजा झाला

CNG Price Hike: मुंबईत १५ दिवसांत दुसऱ्यांदा सीएनजीची दरवाढ; नवा दर किती? रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार?

Traffic Jam: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा; मुंबई-गोवा महामार्गावरही कोंडी

Gavit Sisters Case : भारतात पहिल्यांदा महिलांना मिळणार होती फाशी; कोल्हापूरच्या गावित बहिणींचं क्रौर्य ऐकून थरकाप उडेल!

Latest Marathi News Live Update: साई संस्थानच्या बसला अचानक लागली आग.. प्रवासी भाविक सुखरूप

SCROLL FOR NEXT