सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : मध्य रेल्वेच्या लोकल प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोन प्रवाशांच्या लॅपटॉप बॅगवर डल्ला मारल्याच्या घटना समोर आल्या आहेत. विक्रोळी ते ठाणे आणि डोंबिवली ते ठाणे या दोन स्वतंत्र प्रवासांदरम्यान झालेल्या या चोऱ्यांमध्ये एकूण ७८ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
मुस्कान लालवाणी (वय २७) यांनी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी कामावरून घरी जाण्यासाठी विक्रोळी स्थानकातून ठाणे धीमी लोकल पकडली. महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातील रॅकवर त्यांनी लॅपटॉपची बॅग ठेवली होती. सायंकाळी सातच्या सुमारास ठाणे स्थानकात उतरण्यापूर्वी बॅग पाहिली असता ती गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या बॅगेत ६० हजारांचा लॅपटॉप, तीन हजार रुपये रोख आणि पाकीट असा सुमारे ६३ हजारांचा ऐवज होता. तर, दुसऱ्या घटनेत डोंबिवली येथील मंजुनाथ छोलप्पनवर (३९) यांनी १३ नोव्हेंबर रोजी डोंबिवली स्थानकातून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या लोकलच्या जनरल डब्यात चढल्यानंतर त्यांनी लॅपटॉपची बॅग रॅकवर ठेवली होती. ठाणे स्थानकात पोहोचल्यावर बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बॅगेत १५ हजारांचा लॅपटॉप आणि माऊस असा १५ हजार ३५० रुपयांचा ऐवज होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.