मुंबई

‘आधी गटारे स्वच्छ करा, मग नदीवर बोला!’

CD

‘आधी गटारे स्वच्छ करा, मग नदीवर बोला!’
पात्रातील भरावावर कथोरे यांचा पलटवार; विरोधकांना सुनावले खडे बोल!

बदलापूर, ता. १५ (बातमीदार) : उल्हास नदीपात्रातील छठपूजेवरून शहरातील वातावरण तापलेले असतानाच आमदार किसन कथोरे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘उल्हास नदीच्या स्वच्छतेबाबत बोलणाऱ्यांनी आधी घराशेजारचे नाले-गटारे स्वच्छ करावे आणि मगच नदीच्या स्वच्छतेवर बोलावे,’ असा टोला त्यांनी आज लगावला.
उल्हास नदी बचाव समिती आणि मनसेच्या विरोधी भूमिकेचा समाचार घेताना, काही जणांना केवळ विरोध करायचा असून बदलापूर शहराचे नाव बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही कथोरे यांनी केला. तहसीलदार आजारी असल्याने सुट्टीवर असताना, केवळ बातम्यांच्या आधारे नगरपालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या नोटीसमध्ये ५० ब्रास मातीचा उल्लेख असला तरी उल्हास नदीपात्रात ५० घमेले मातीसुद्धा नाही, असे कथोरे यांनी स्पष्ट केले. सात दिवसांनंतर तहसीलदारांना स्वतः घटनास्थळी आणून प्रत्यक्ष माती मोजायला लावणार असल्याचे आव्हानही त्यांनी दिले. छठपूजा ही हिंदू संस्कृतीत महत्त्वाची असून, देशातील सर्वधर्मसमभावाच्या परंपरेनुसार उत्तर भारतीय बांधवांना हा सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी भाजप सदैव त्यांच्या पाठीशी असल्याचे कथोरे यांनी सांगितले. बदलापूरमध्ये उत्तर भारतीय बांधव अनेक वर्षांपासून शांततेत आणि गुण्यागोविंदाने राहत असून, शहराच्या विकासात त्यांचेही योगदान आहे. त्यामुळे धार्मिक उत्सवाच्या आयोजनाला विरोध करण्याऐवजी शहरात सुरू असलेल्या विकासकामांवर चर्चा करावी, असे आव्हान त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भात थंडीचा कडाका वाढला! तापमानात ५ अंशांची घसरण, पारा थेट १३ अंशांवर; नागपूरसह अनेक जिल्ह्यांत हुडहुडी

एसटी चालक-वाहकाचा मनमानी कारभार! विद्यार्थिनींना रात्री अंधारात अर्ध्या रस्त्यात उतरविलं, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! ICC कडून २०३५ पर्यंतचं वेळापत्रक जाहीर; भारतात कधी होणार वर्ल्ड कप?

राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार! मंगळवारपासून कामकाज ठप्प होणार? नेमक्या मागण्या काय?

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT