मुंबई

छठपूजा उत्सवात राजकारण नको ः शिंदे

CD

छठपूजा उत्सवात राजकारण नको ः शिंदे

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : राज्यातील प्रत्येक समाजाच्या सण-उत्सवांत सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा माझा प्रयत्न असतो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीप्रमाणेच छठपूजाही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवांमध्ये राजकारण आणू नये, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विरोधकांवर केली.

वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव परिसरात रविवारी (ता. १५) आयोजित छठपूजा उत्सवात ते बोलत होते. आपली संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सव पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे, असे शिंदे म्हणाले. छठपूजा हा केवळ धार्मिक विधी नसून, भारतीय संस्कृती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. उगवत्या आणि मावळत्या सूर्याची पूजा करून निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची शिकवण या सणातून मिळते. महिला अत्यंत श्रद्धेने हे व्रत करतात. कुटुंबाची सुख-समृद्धी, मुलांचे उज्ज्वल भविष्य आणि समाजाच्या कल्याणासाठी केली जाणारी ही उपासना भारतीय संस्कृतीतील अनोखी परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्सवांच्या माध्यमातून बंधुभाव अधिक दृढ करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. २०२२ मध्ये मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोरोनाकाळातील निर्बंध हळूहळू हटवून सर्व सण-उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांना मोकळीक देण्याचा निर्णय घेतल्याची आठवणही शिंदे यांनी करून दिली. राज्यातील शेतकरी सध्या विविध संकटांचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांनी एकजुटीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसोबत असून, समाजातील प्रत्येक घटकानेही मदतीसाठी पुढे यावे. संकटाच्या काळात राजकारण न करता माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

फटाकेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन
रायलादेवी तलाव परिसरातील छठपूजा उत्सवात हवेत उडविल्या जाणाऱ्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. काही दिवसांपूर्वी वागळे इस्टेट येथील कार्लाइन इमारतीला लागलेल्या भीषण आगीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हवेत फुटणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली होती. असे असतानाही उत्सवात आतषबाजी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भात थंडीचा कडाका वाढला! तापमानात ५ अंशांची घसरण, पारा थेट १३ अंशांवर; नागपूरसह अनेक जिल्ह्यांत हुडहुडी

एसटी चालक-वाहकाचा मनमानी कारभार! विद्यार्थिनींना रात्री अंधारात अर्ध्या रस्त्यात उतरविलं, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! ICC कडून २०३५ पर्यंतचं वेळापत्रक जाहीर; भारतात कधी होणार वर्ल्ड कप?

राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार! मंगळवारपासून कामकाज ठप्प होणार? नेमक्या मागण्या काय?

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल, तरी ४६३ किमी धावली; रेल्वेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT