मुंबई

अंधेरी वृत्तपत्र विक्रेता सेनेतर्फे गुणवंतांचा सन्मान

CD

मुंबई, ता. १६ : अंधेरी वृत्तपत्र विक्रेता सेनेतर्फे १३ नोव्हेंबरला शहाजीराजे क्रीडा संकुल येथे २६वा कौटुंबिक आनंद सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. आशीष सरवदे उपस्थित होते. त्यांनी मधुमेह या आजाराविषयी मार्गदर्शन करून उपस्थितांना आरोग्यविषयक मोलाचे संदेश दिले.

सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ऋतुजा परब (अभियांत्रिकी पदवीधर), प्रियांका परब (वकील), माधुरी शिंदे (आर्किटेक्ट), प्राजक्ता नाईक, संस्कृती निंबाळकर (कला व गायन) आणि संपदा कदम (शौर्य) यांचा गौरव करण्यात आला. तसेच वयाच्या ८२व्या वर्षीही वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय निष्ठेने करणारे भाई तेंडुलकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष तथा अंधेरी वृत्तपत्र विक्रेता सेनेचे अध्यक्ष मधुसूदन सदडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर संघाचे कोषाध्यक्ष तथा सेनेचे सचिव रवींद्र चिले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठीसाठी एस मुर्गन, अबोध शिर्के, हरेश शाह, राजन यादव, प्रकाश कदम यांनी परिश्रम घेतले.

मुंबई : अंधेरी वृत्तपत्र विक्रेता सेनेतर्फे गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti news : सोलापुरात ऊस दरावरून रणकंदन; राजू शेट्टी आक्रमक

Luck Zodiac Signs: पुढचे १२२ दिवस या राशींवर पडणार पैशांचा पाऊस! गुरूच्या वक्री चालीचा मोठा फायदा; नशिबाची दारं उघडणार? तुमची रास कोणती?

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Latest Marathi News Update : सोलापूरनंतर आता 'स्वाभिमानी'चा मोर्चा बारामतीकडे; ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी कारखान्यांना २५ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

SCROLL FOR NEXT