मुंबई

भगवद्‍गीता श्लोक पठण स्पर्धेची रंगणार पर्वणी

CD

उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा असलेल्या श्रीमद्‍भगवद्‍गीतेतील ज्ञानाची गोडी नव्या पिढीला लागावी, संस्कृत भाषेची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये शुद्ध उच्चारांसह श्लोकपठणाची परंपरा रुजावी, या उद्देशाने संस्कृत भाषा संस्था आणि अखिल भारतीय कीर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य भगवद्‍गीता श्लोक पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे वयोमर्यादा नसल्याने सर्वांनाच सहभागाची संधी मिळणार आहे.
संस्कृत भाषा संस्था आणि अखिल भारतीय कीर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डिसेंबर व जानेवारीमध्ये भगवद्‍गीतग श्लोक पठण स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत; तसेच संस्कृतप्रेमी नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे. स्पर्धेसाठी पाच गट निश्चित केले असून, पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांना १०, तिसरी-चौथीच्या विद्यार्थ्यांना १५, पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना २०, आठवी ते दहावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २०, तर खुल्या गटातील स्पर्धकांना २५ श्लोक म्हणावे लागणार आहेत. स्पर्धकांनी भगवद्‍गीतेच्या चौदाव्या अध्यायातील श्लोक सलग, शुद्ध आणि स्पष्ट उच्चारांत सादर करणे आवश्यक आहे. प्रत्येक गटात चार पारितोषिके देण्यात येणार असून, सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळणार आहे. स्पर्धेचे प्रवेशशुल्क ४० रुपये असून, ते स्पर्धेच्या ठिकाणी जमा करावे लागणार आहे. नावनोंदणीची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर जाहीर करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी मंजुषा बुरुजवाले, अर्चना वाणी आणि भारती महाजन यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

Latest Marathi News Update : मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानातील सुरक्षारक्षकांना मारहाण प्रकरण; न्यायालयाकडून तिन्ही आरोपींना जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT