मुंबई

कँडल मार्चमध्ये सहभागी झाल्याने वाद

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या कँडल मार्चमध्ये सहभागी झाल्याच्या कारणावरून मनोरमानगर येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. शनिवारी (ता. १४) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारात तिघे जखमी झाले असून, कापूरबावडी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.

संताजी शिंदे यांच्या तक्रारीनुसार, अमित पांडे आणि विश्वजीत झा यांनी जुन्या वादातून त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच बर्फ फोडण्याच्या टोच्याने पोटावर आणि छातीखाली वार केल्याने ते जखमी झाले. यापूर्वी विश्वजीत याने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. अमित पांडे यांच्या तक्रारीनुसार, ते मित्र विश्वजीत झा यांच्यासोबत मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना संताजी उर्फ बाळा शिंदे आणि धनाजी शिंदे यांनी त्यांना ११ नोव्हेंबरच्या कँडल मार्चमध्ये सहभागी झाल्याबाबत जाब विचारला. त्यानंतर संताजी यांनी लोखंडी रॉडने डोक्यावर, तर धनाजी यांनी त्याच रॉडने पायांवर मारहाण केली. तसेच सिमेंट ब्लॉकने छाती व खांद्यावर मारल्याचा आरोप आहे. विश्वजीत यालाही मारहाण करून हात पिळल्याचे तक्रारीत नमूद आहे. दोन्ही गटांतील जखमींनी ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

ट्रेनिंगदरम्यान जुळले प्रेमाचे धागे, IAS-IPS अधिकारी अडकले विवाहबंधनात; विवेक आर्य आणि अदिती सिंग यांची लव्हस्टोरी चर्चेत

FSSAI ने आणला दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी खास लोगो; ग्राहकांना काय होणार फायदा? जाणून घ्या

Video: 13 Six, 8 Fours अन् ४१ चेंडूत शतक...रजत पाटिदारने इतिहास घडवला; SMAT स्पर्धेत 'असा' पराक्रम करणारा पहिलाच

Latest Marathi News Update : मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावरील हल्ला प्रकरणातील ३ आरोपींना जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT