मुंबई

करवसुली कर्मचाऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख

CD

करवसुली कर्मचाऱ्यांना मिळणार अधिकृत ओळख
‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; श्रीवर्धन नगर परिषदेकडून गणवेश आणि ओळखपत्र देण्याचा निर्णय
श्रीवर्धन, ता. १५ (वार्ताहर) : शहराच्या प्रवेशद्वारांवर उपविधी कर वसुली करताना कर्मचाऱ्यांना पर्यटकांच्या हुज्जतीला सामोरे जावे लागत असल्याने श्रीवर्धन नगर परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र गणवेश आणि अधिकृत ओळखपत्र देण्यात येणार आहे. ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत उपनगराध्यक्ष अनंत गुरव यांनी याबाबत तातडीने निर्देश दिले आहेत.
श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला ‘ब्लू फ्लॅग’ मानांकन मिळाल्यानंतर शहरात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. शहराच्या प्रवेशद्वारांवर पर्यावरण नियंत्रण व स्वच्छता कराची वसुली केली जाते. मात्र, काही पर्यटकांकडून कर भरण्यास टाळाटाळ केली जात असून, त्यातून कर्मचाऱ्यांशी वादाचे प्रसंग घडत आहेत. कर्मचाऱ्यांकडे गणवेश किंवा अधिकृत ओळखपत्र नसल्याने त्यांच्या ओळखीबाबतही संभ्रम निर्माण होत होता.
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ‘सकाळ’ने १४ नोव्हेंबरच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर नगर परिषदेने कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि करवसुली प्रक्रियेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दोन्ही प्रवेशद्वारांवरील कर्मचाऱ्यांना लवकरच गणवेश आणि ओळखपत्र दिले जाणार आहे.

प्रशासनाकडून सुरक्षिततेची हमी
अधिकृत गणवेश आणि ओळखपत्रामुळे पर्यटकांना करवसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख पटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे गैरसमज आणि वादाचे प्रसंग कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच वाहनांच्या रांगा टाळण्यासाठीही या निर्णयाचा उपयोग होऊ शकतो.

प्रतिक्रिया
‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची आम्ही तातडीने दखल घेतली आहे. करवसुली कर्मचाऱ्यांची अधिकृत ओळख स्पष्ट व्हावी आणि पर्यटकांशी होणारे वाद टळावेत, यासाठी त्यांना स्वतंत्र गणवेश व ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
— अनंत गुरव, उपनगराध्यक्ष, श्रीवर्धन नगर परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti news : सोलापुरात ऊस दरावरून रणकंदन; राजू शेट्टी आक्रमक

Luck Zodiac Signs: पुढचे १२२ दिवस या राशींवर पडणार पैशांचा पाऊस! गुरूच्या वक्री चालीचा मोठा फायदा; नशिबाची दारं उघडणार? तुमची रास कोणती?

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Latest Marathi News Update : सोलापूरनंतर आता 'स्वाभिमानी'चा मोर्चा बारामतीकडे; ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी कारखान्यांना २५ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

SCROLL FOR NEXT