मुंबई

ठाण्यात अपघातांची मालिका

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : शहर परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातांत एका महिलेचा मृत्यू झाला असून, पोलिस कर्मचाऱ्यासह तिघे जखमी झाले आहेत. खारेगाव टोलनाका, ओवळा आणि गोकुळनगर परिसरात या घटना घडल्या. अपघातांनंतर संबंधित वाहनचालकांनी निष्काळजीने वाहन चालविल्याचा दावा तक्रारींमध्ये करण्यात आला आहे.

ओवळा येथे रविवारी (ता. १५) पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. रफीक सय्यद आणि त्यांची पत्नी रोशन हे दुचाकीवरून घोडबंदर मार्गाने मिरा रोडकडे जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाले. अपघातानंतर ट्रेलरचालक न थांबता पसार झाला. उपचारादरम्यान रोशन सय्यद यांची प्रकृती खालावली. पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या घटनेत खारेगाव टोलनाक्याजवळ १२ नोव्हेंबरला सकाळी सतनामसिंग मथारू (वय ५२) हे दुचाकीवरून जात असताना गुजरात पासिंगच्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. कारचालकाने अचानक वेगात वळण घेतल्याने अपघात झाल्याचे त्यांच्या पत्नी जसमीतकौर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या अपघातात सतनामसिंग जखमी झाल्याने त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

गोकुळनगर परिसरात १२ नोव्हेंबरला सकाळी मिनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपुलाजवळ रिक्षाचालकाने दुचाकीवरून जाणारे पोलिस कर्मचारी हनुमंत राकुसले यांना धडक दिली. या अपघातात त्यांना दुखापत झाली. त्यांच्यावर भांडुप येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Scam: आयोगाचे दोन सदस्य चौकशी समितीच्या रडार वर? तुकाराम मुंढे काय कारवाई करणार?

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

राज ठाकरेंची मोठी खेळी! बड्या नेत्यांसह ३५० कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश, एकनाथ शिंदेंसह छावा संघटनेला धक्का

Kulgam Encounter: कुलगाम हल्ल्याचा बदला! लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर लतीफ भटसह दोन दहशतवादी ठार; जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांची मोठी कारवाई

Latest Marathi News Update : सोलापुरातील ऊस उत्पादक शेतकरी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाही

SCROLL FOR NEXT