मुंबई

उड्डाणपुलांवरील फुगवटे हटले

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : उष्णतेच्या तडाख्यामुळे उड्डाणपुलांवरील मास्टिकचे फुगवटे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत होते. त्यामुळे अखेर हे फुगवटे मिलिंग मशीनच्या साह्याने हटविण्यात आले. मात्र, फुगलेला थर खरवडून काढल्यानंतर रस्त्यांची डागडुजी करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. परिणामी, मिलिंग केलेल्या भागांवर चिरा आणि उंच-सखल पृष्ठभाग निर्माण झाले आहेत. या मार्गावरून प्रवास करताना विशेषतः दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे.

ठाणे शहरातील पातलीपाडा, माजिवडा उड्डाणपूल; तसेच घोडबंदर मार्गावरील विविध पुलांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मास्टिकचा वापर करण्यात आला होता. मात्र, उन्हाचा तडाखा वाढताच मास्टिकचा थर फुगून वर येऊ लागला. त्यामुळे दुचाकी आणि रिक्षाचालकांना वाहनांवरील नियंत्रण राखताना मोठी कसरत करावी लागत होती. याबाबत तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाने मिलिंग मशीनच्या साह्याने फुगलेला थर खरवडून काढला. मात्र, मिलिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करून ते सुस्थितीत आणणे आवश्यक असतानाही प्रत्यक्षात डागडुजी करण्यात आले नाही. त्यामुळे मिलिंग केलेल्या भागांवर चिरा, खडबडीत पृष्ठभाग आणि उंच-सखल भाग कायम आहेत. या ठिकाणांवरून जाताना दुचाकींचा तोल जाण्याची शक्यता असून, वेगाने येणाऱ्या वाहनांसाठीही हे भाग धोकादायक ठरत आहेत. अपघात झाल्यानंतर जाग येण्याऐवजी महापालिकेने तातडीने डागडुजी करून उड्डाणपुलांवरील प्रवास सुरक्षित करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

रस्त्यावर मोठी वर्दळ
घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहसंकुले उभी राहत असल्याने लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. वसई आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने दिवसभर या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत उड्डाणपुलांवरील रस्त्यांची दुरवस्था वाहनचालकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.

डागडुजीचे काम रखडले
दरवर्षी पावसाळ्यात घोडबंदर मार्गावरील पुलांवर खड्डे पडण्याची समस्या निर्माण होते. मागील वर्षी एमएमआरडीए, एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मास्टिक पद्धतीने खड्डे बुजविण्यात आले होते. यंदा कापूरबावडी ते गायमुखदरम्यानचा सुमारे १०.५ किलोमीटरचा रस्ता ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित झाल्याने या मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेवर आली. त्यानुसार खड्डे बुजविण्यासाठी मास्टिकचा वापर करण्यात आला. मात्र, उष्णतेमुळे हेच मास्टिक फुगल्याने प्रशासनाला ते मिलिंग मशीनच्या साह्याने काढावे लागले. मास्टिक हटविण्याची कारवाई झाली; मात्र रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम रखडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महागमार्ग धाराशिवमध्ये रोखला! सोलापूरमध्ये राजू शेट्टींची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; आता मोर्चा बारामतीकडे...

Kartiki Wari : संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर; चार डिसेंबरला कार्तिकी एकादशीची मुख्य पहाट पूजा, आठ डिसेंबरपर्यंत वारी

Bhimashankar Temple : भीमाशंकरला जाणाऱ्या भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका; दर्शनाची वेळ आणि वाहतूक व्यवस्था पूर्वीप्रमाणेच

Raju Shetti news : सोलापुरात ऊस दरावरून रणकंदन; राजू शेट्टी आक्रमक

Luck Zodiac Signs: पुढचे १२२ दिवस या राशींवर पडणार पैशांचा पाऊस! गुरूच्या वक्री चालीचा मोठा फायदा; नशिबाची दारं उघडणार? तुमची रास कोणती?

SCROLL FOR NEXT