मुंबई

ठाणे महापालिकेत आठ उपअभियंत्यांना पदोन्नती

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाणे महापालिकेच्या स्थापत्य विभागातील आठ उपअभियंत्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता या वर्ग एकच्या पदावर नियुक्तीसाठी विभागीय पदोन्नती निवड समितीने आठ अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली आहे. प्रशासनानेही या पदोन्नतीला मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव महासभेकडे पाठविला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेला पदोन्नतीची जोड मिळणार असून तो निर्णय महासभेच्या मंजुरीवर अवलंबून आहे.
महापालिकेत कार्यकारी अभियंत्यांची ३५ पदे मंजूर असून सध्या ३० अधिकारी कार्यरत आहेत. रिक्त आणि आगामी काळात रिक्त होणाऱ्या पदांचा विचार करून पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली. ५ नोव्हेंबरला अतिरिक्त आयुक्त-१ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत आठ उपअभियंत्यांच्या सेवा अभिलेखांची पडताळणी करण्यात आली. सेवाज्येष्ठता, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि गोपनीय अहवालांचा आढावा घेतल्यानंतर पदोन्नतीसाठी शिफारस करण्यात आली. या यादीत शैलेंद्र चारी, अतुल भोळे, माधव जागडे, अनिल पाटील, किशोर गोळे, उमेश भोसले, ऋषिकेश जवळकर आणि राजेंद्र आर. कुसुरकर यांचा समावेश आहे. एस-२० वेतनश्रेणीतील उपअभियंत्यांना एस-२३ वेतनश्रेणीतील कार्यकारी अभियंतापदी पदोन्नती देण्याचा प्रस्ताव आहे.
दरम्यान, समितीची शिफारस म्हणजे पदोन्नती निश्चित झालेली नाही. वर्ग एकच्या पदांवरील पदोन्नतीसाठी महासभेचा ठराव आणि त्यानंतर राज्य सरकारची पूर्वमंजुरी आवश्यक आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिकेवरील अंतिम निकालाच्या अधीन राहून ही पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपात दिली जाणार आहे. त्यामुळे महासभा या प्रस्तावाला मंजुरी देते का आणि सरकारकडून मान्यता कधी मिळते, याकडे आठही अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शैलेंद्र चारी यांचे प्रकरण लक्षवेधी
या प्रक्रियेत शैलेंद्र चारी यांचे प्रकरण विशेष लक्षवेधी ठरले आहे. त्यांच्यावर यापूर्वी शिस्तभंगाची कारवाई करत एक वर्षासाठी वेतनश्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणण्याची शिक्षा देण्यात आली होती. या शिक्षेची मुदत २६ मे २०२६ रोजी संपल्यानंतर समितीने त्यांच्याबाबत मोहरबंद पाकिटात ठेवलेला अभिप्राय उघडला. त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार त्यांच्या पदोन्नतीची शिफारस करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकांना वाटलं आम्ही हरलो... तीन कोटींची फसवणुक अन् जेल, 'रंग माझा वेगळा' फेम साईशाच्या आईने सोडलं मौन, म्हणते-

Farmer Agitation : बारामती ॲग्रोची गव्हाण बंद! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर व पहिली उचल ३९०० रुपये देण्याची मागणी

Latest Marathi News Update : सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बेमुदत आंदोलनाची घोषणा; उसाची पहिली उचल ३५०० रुपये मिळावी यासाठी संघटना आक्रमक

Latur Politics: विधानसभा पराभवानंतर धीरज देशमुखांचं दमदार कमबॅक; जिल्हा बँकेवर पुन्हा वर्चस्व!

'ठरलं तर मग' बंद करा आता म्हणणाऱ्याला जुई गडकरीनेच दिलं थेट उत्तर! म्हणाली, 'तुम्हाला आवडत नसेल तर...'

SCROLL FOR NEXT