जुईनगर, ता. १६ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटमधील तब्बल ४० कोटी ५४ लाखांच्या रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा कारभार आता संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेवर सुरुवातीपासूनच आक्षेप घेतले जात असताना, अध्यक्ष आणि सचिवांची पूर्वमान्यता न घेता कार्यादेश ऑनलाइन अपलोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची दखल घेत बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर यांनी धान्य मार्केटचे उपअभियंता पांडुरंग पिंगळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. खुलासा असमाधानकारक आढळल्यास सेवा नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.
या रस्ते काँक्रिटीकरण कामाची निविदा प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे. निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या दोन निविदाधारकांमध्ये हितसंबंधांचा संघर्ष असल्याची तक्रार बाजार समिती प्रशासनासह पणन संचालकांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत पणन संचालकांनी विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. तसेच, तत्कालीन संचालक मंडळाच्या बैठकीत संबंधित काम रद्द करून फेरनिविदा मागविण्याबाबत निर्णय झाल्याचे समजते.
विशेष म्हणजे, तत्कालीन संचालक मंडळातील चार सदस्यांनीही बाजार समिती प्रशासनाला पत्र देऊन या निविदा प्रक्रियेतील दोन निविदाधारकांमध्ये हितसंबंधांचा संघर्ष असल्याचा आक्षेप नोंदविला होता. संबंधित निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा मागविण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, एवढ्या तक्रारी आणि आक्षेपांनंतरही कार्यादेश देण्याची प्रक्रिया पुढे कशी गेली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.