मुंबई

बंध विक्रीतून ग्रामीण भागाला रोजगार

CD

बंधविक्रीतून ग्रामीण भागाला रोजगार
भातकापणीच्या हंगामात मागणी वाढली; आदिवासी कुटुंबांचा पारंपरिक व्यवसाय

पडघा, ता. १६ (बातमीदार) : भातकापणीनंतर पिकाचे भारे बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘बंध’च्या विक्रीतून भिवंडी तालुक्यातील ग्रामीण आणि आदिवासी कुटुंबांना रोजगार मिळत आहे. पडघा येथील रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात परिसरातील नागरिकांनी बंध विक्रीसाठी आणले होते. यंदा शेकड्याचा दर २५० ते ३०० रुपये असल्याने या पारंपरिक व्यवसायातून ग्रामीण कुटुंबांना आर्थिक आधार मिळत आहे.

यंदा पावसाचे आगमन महिनाभर उशिराने झाल्याने भातलागवडीचे वेळापत्रकही पुढे गेले. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने काही ठिकाणी भातपिके करपली, तर काही शेतकऱ्यांची पिके कापणीसाठी तयार झाली आहेत. भाताचा दर्जा अपेक्षेप्रमाणे नसल्याने शेतकरी अडचणीत असले, तरी तयार झालेले पीक कापून त्याचे भारे बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘बंध’ला मागणी वाढली आहे.

ग्रामीण भागातील, विशेषतः आदिवासी कुटुंबे जंगलातून ओले बांबू आणून त्यांचे तुकडे करतात. ते ठेचून सुकवल्यानंतर त्याच्या बंधांचे गठ्ठे तयार करून बाजारात विक्रीसाठी आणले जातात. या कामात कुटुंबातील महिला, पुरुष आणि मुलेही सहभागी होतात. मागील वर्षाच्या तुलनेत दर वाढले असले, तरी शेतकऱ्यांकडून बंधांची खरेदी सुरू असल्याचे बाजारातील चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti news : सोलापुरात ऊस दरावरून रणकंदन; राजू शेट्टी आक्रमक

Luck Zodiac Signs: पुढचे १२२ दिवस या राशींवर पडणार पैशांचा पाऊस! गुरूच्या वक्री चालीचा मोठा फायदा; नशिबाची दारं उघडणार? तुमची रास कोणती?

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Latest Marathi News Update : सोलापूरनंतर आता 'स्वाभिमानी'चा मोर्चा बारामतीकडे; ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी कारखान्यांना २५ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

SCROLL FOR NEXT