मुंबई

मुंब्र्यात मिठाई खाल्ल्यानंतर तिघांना त्रास; एकाचा मृत्यू

CD

मुंब्र्यात मिठाई खाल्ल्यानंतर तिघांना त्रास; एकाचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील सागर स्वीट्समधून खरेदी केलेली मिठाई खाल्ल्यानंतर तिघांची प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली. यातील ३५ वर्षीय जुबेर अन्सारी यांचा उपचारादरम्यान रविवारी (ता. १५) मृत्यू झाला. अन्य दोघांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिठाई खाल्ल्यामुळेच जुबेर यांचा मृत्यू झाला, हे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.
मुंब्रा येथील अन्सारी कुटुंबीयांनी ८ नोव्हेंबरला संबंधित दुकानातून मिठाई खरेदी केली होती. १० नोव्हेंबरला कुटुंबातील काही सदस्यांनी ती खाल्ली. त्यानंतर ११ नोव्हेंबरला तिघांना त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर दोघांची प्रकृती सुधारली; मात्र जुबेर अन्सारी यांची प्रकृती खालावत गेली. अखेर रविवारी (ता. १५) त्यांचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंब्रा पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने संबंधित मिठाईच्या दुकानावर कारवाई केली. दुकान बंद करण्यात आले असून, मिठाईचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी प्रियंका व्हिसे यांनी ही माहिती दिली.
.....
नमुने तपासणीसाठी पाठवले
मृत जुबेर यांचे भाऊ सुहेल अन्सारी आणि सलमान अन्सारी यांनी मिठाईच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. मिठाई खाल्ल्यामुळेच जुबेर यांचा मृत्यू झाला, हे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आणि मिठाईच्या नमुन्यांचा प्रयोगशाळेतील तपासणी अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. तसेच मिठाईतून विषबाधा झाली होती का, हेही समजू शकेल. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जावदवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकांना वाटलं आम्ही हरलो... तीन कोटींची फसवणुक अन् जेल, 'रंग माझा वेगळा' फेम साईशाच्या आईने सोडलं मौन, म्हणते-

Farmer Agitation : बारामती ॲग्रोची गव्हाण बंद! स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसाला प्रतिटन ४२०० रुपये दर व पहिली उचल ३९०० रुपये देण्याची मागणी

Latest Marathi News Update : सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बेमुदत आंदोलनाची घोषणा; उसाची पहिली उचल ३५०० रुपये मिळावी यासाठी संघटना आक्रमक

Latur Politics: विधानसभा पराभवानंतर धीरज देशमुखांचं दमदार कमबॅक; जिल्हा बँकेवर पुन्हा वर्चस्व!

'ठरलं तर मग' बंद करा आता म्हणणाऱ्याला जुई गडकरीनेच दिलं थेट उत्तर! म्हणाली, 'तुम्हाला आवडत नसेल तर...'

SCROLL FOR NEXT