मुंबई

‘सीईटी’चे वेळापत्रक जाहीर

CD

‘सीईटी’चे वेळापत्रक जाहीर

२१ सीईटी परीक्षा; ११ अभ्यासक्रमांसाठी दोन संधी

मुंबई, ता. १६ : सीईटी सेलने शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा २१ सीईटी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यापैकी ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रथमच घेतल्या जाणार आहेत. जानेवारीत परीक्षा सुरू होऊन १० जून २०२७ पर्यंत विविध सीईटी परीक्षा पार पडणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पीसीएम, पीसीबी, एमबीए, एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम, पाच वर्षीय एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम अशा एकूण ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी घेतली जाणार आहे. तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएड अभ्यासक्रमाची सीईटी यंदा घेतली जाणार नाही. त्याचबरोबर एमपीएड व एमएड व बीएड या परीक्षा जूनमध्ये घेण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक व पुढील सूचनांसाठी सीईटी कक्षाच्या https://cetcell.mahacet.org/ संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
--
सीईटी
दोन संधीच्या संभाव्य तारखा
एमबीए, एमएमएस, पीजीडीएम : २८ ते ३० जानेवारी आणि १ ते ३ एप्रिल
एलएलबी (५ वर्षीय ) : २८ ते २९ मार्च आणि २४ मे
पीसीबी समूह : ८ ते १३ एप्रिल आणि ६ ते ८ मे
पीसीएम समूह : १६ ते २६ एप्रिल आणि १० ते १५ मे
बीएचएमसीटी,बीसीए, बीबीए बीबीएम : २८ ते ३० एप्रिल आणि २७ ते २८ मे
-------------
इतर
एम.एचएमसीटी : २४ मार्च २०२७
एमसीए : २७ मार्च २०२७
एएसी- कला शिक्षण : ११ एप्रिल २०२७
बी. डिझाईन : १८ एप्रिल २०२७
एलएलबी (तीनवर्षीय) : ४ व ५ मे २०२७
डीपीएन/पीएचएन : १८ मे २०२७
नर्सिंग : १८ व १९ मे २०२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivneri Sugars : सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी अखेर फुटली; शिवनेरी शुगर्सने ३९०० रुपये पहिली उचल जाहीर करताच स्वाभिमानीचे आंदोलन पाच दिवस स्थगित

Gold Price: हॉलमार्क असलेलं सोनं खरंच शुद्ध असतं का? CAG च्या अहवालाने उघड झाला सरकारी यंत्रणेचा ढिसाळपणा

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Syed Mushtaq Ali Trophy: संजू सॅमसनची तुफानी फटकेबाजी अन् मग निधीशच्या ५ विकेट्स; महाराष्ट्राचा केरळकडून दारुण पराभव!

Professor Recruitment Issue : प्राध्यापक भरतीचा मुहूर्त कधी? नऊ महिन्यांपासून प्रक्रिया रखडली; नेट-सेट, पीएच.डी.धारकांचे पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT