मुंबई

छठपूजेनंतर उल्हास नदीपात्रातील भराव हटवण्यास सुरुवात

CD

छठपूजेनंतर उल्हास नदीपात्रातील भराव हटवण्यास सुरुवात
भराव टाकण्यापासून हटवण्यापर्यंतचा खर्च आयोजकांकडून वसूल होणार
बदलापूर, ता. १६ (बातमीदार) : उल्हास नदीपात्रात छठपूजेच्या आयोजनासाठी करण्यात आलेला मातीचा भराव हटवण्यास सोमवारी (ता. १६) सुरुवात झाली. जेसीबी आणि डम्परच्या सहाय्याने सकाळपासून माती काढण्याचे काम हाती घेण्यात आले. भराव करण्यापासून तो हटवण्यापर्यंतचा संपूर्ण खर्च तसेच दंडाची रक्कम संबंधित आयोजकांकडून वसूल करण्याची भूमिका कुळगाव-बदलापूर नगर परिषद प्रशासनाने घेतली आहे.

छठपूजेसाठी नदीपात्रात करण्यात आलेल्या मातीच्या भरावाला मनसे, उल्हास नदी बचाव समिती आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. यामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह आणि पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. तसेच, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता आणि पूर नियंत्रण रेषेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भराव केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी अंबरनाथ तहसीलदारांनी नगर परिषदेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. दरम्यान, भाविकांना पूजेसाठी नदीपात्रात सुरक्षितपणे जाता यावे, यासाठी आयोजकांनी माती टाकल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. रविवारी छठपूजा संपल्यानंतर सोमवारी भराव हटवण्याचे काम सुरू झाले. नदीपात्र पूर्ववत करण्यासाठी ही कार्यवाही सुरू असल्याचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सांगितले.

खर्चासह दंडाचीही वसुली
परवानगीशिवाय माती टाकणे आणि गौणखनिज शुल्क न भरल्याप्रकरणी महसूल विभागानेही नोटीस बजावली आहे. त्यामुळे भरावाचा आणि तो हटवण्याचा खर्च तसेच नियमानुसार दंड आयोजकांकडून वसूल केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri Chinchwad RTO : पिंपरी चिंचवड आरटीओच्या रडार यंत्रणेमुळे सात महिन्यांत १० हजार ७१३ वाहनचालकांवर कारवाई; ८९ कोटींहून अधिक दंड आकारला

Congress: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून स्क्रीनिंग कमिट्या जाहीर; उत्तर प्रदेशची जबाबदारी 'या' नेत्याकडे

MLA Shankar Mandekar : मुळशी तालुक्यात नव्याने पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश; आमदार मांडेकर यांच्या पाठपुराव्याला यश

Kalbhor Nagar : काळभोरनगरमधील सूर्योदय कॉम्प्लेक्स परिसरात दोन वर्षांपासून सिमेंटचा धुरळा आणि रासायनिक दुर्गंधीचा त्रास; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Pune Airport : प्रवाशांची वाट पाहण्यासाठी टर्मिनलवर थांबणाऱ्या वाहनांवर विमानतळ प्रशासनाची नजर; एनपीआर कॅमेऱ्यांद्वारे वेळेची नोंद होणार

SCROLL FOR NEXT