कासात राष्ट्रवादीचा विस्तार
अनेक कार्यकर्त्यांचा पक्षात प्रवेश
कासा, ता. १७ (बातमीदार) : डहाणू तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या उद्देशाने कासा येथे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. बिरसा मुंडा जयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.
या वेळी महिला जिल्हाध्यक्ष रोहिणी शेलार, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग बेलकर, अशरफ घची, सुनील नलवडे, योगेश बन, स्वाती राऊत, मोखाडा तालुकाध्यक्ष विलास पाटील, विपुल राऊत, जिल्हा खजिनदार जितेंद्र पटेल, रोहित चक्रवर्ती, शर्मिला भानुशाली आणि जव्हार नगरपालिका सभापती इम्रान मेमन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दीपेश रसाळ, महेश बोलकर, धर्मा बोलकर या यूट्यूब कलाकारांसह मधु मेरे यांनी पक्षात प्रवेश केला. काही काळ पक्षापासून दूर गेलेल्या नाराज कार्यकर्त्यांनीही पुन्हा पक्षात घरवापसी केली. जिल्हाध्यक्ष ठाकूर यांनी नवागतांचे स्वागत करून डहाणू तालुक्यात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्रिय काम करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. ‘अजित पवार अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कासा येथे कार्यालय सुरू झाल्याने पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक कामाला बळ मिळणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.