मुंबई

कुर्ला सिग्नलवर वाहतूक कोंडी

CD

कुर्ला सिग्नलवर वाहतूक कोंडी
बांधकामामुळे रस्त्याचा काही भाग बंद; वाहनचालकांसह प्रवासी त्रस्त
चेंबूर, ता. १७ (बातमीदार) : कुर्ला सिग्नल मार्गावर सुरू असलेल्या बांधकामामुळे रस्त्याचा काही भाग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी, या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू असून, सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवासी, प्रवासी आणि वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
कुर्ला सिग्नल हा मुंबईतील महत्त्वाचा वाहतूक मार्ग आहे. या मार्गावरून ठाणे, सायन, माहुल, वाशीनाका, वाशी आणि पनवेलसह विविध भागांत जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या मार्गावर दिवसभर वाहतुकीचा ताण असतो.
मानखुर्द (मंडाळे) ते अंधेरी पश्चिमेतील डी. एन. नगरला जोडणाऱ्या मेट्रो मार्गिका २बचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर महापालिका आणि रस्ते विभागाकडूनही विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या कामांमुळे रस्त्याचा काही भाग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उपलब्ध रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढून वाहतुकीचा वेग मंदावला आहे.
विशेषतः सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वाहनचालकांना बराच वेळ कोंडीत अडकून पडावे लागत असून, नोकरदार, विद्यार्थी आणि सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसत आहे.

रस्ता पूर्ववत करावा!
वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी योग्य नियोजन करून वाहतूक सुरळीत करावी, बांधकामाची कामे लवकर पूर्ण करून रस्ता पूर्ववत खुला करावा, तसेच बांधकामाच्या ठिकाणी सूचना फलक आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

MS Dhoni Retire: महेंद्रसिंग धोनीने त्याचा निवृत्तीचा निर्णय CSK ला केव्हा आणि कसा कळवला? म्हणाला, माझं नाव त्यात लिहा...

Amazon: ॲमेझॉनची भारतात 7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना; 2030 पर्यंत चार सौर आणि पवनऊर्जा प्रकल्प उभारणार

उद्या ५ राशींच्या आयुष्यात होणार महत्त्वाचे बदल; आर्थिक निर्णय घेताना सावध राहा!

Success Story: ऑफिसवेअरच्या शोधात सुरू झाला स्वतःचा ब्रँड; नागपूरच्या तरुणीने साडेपाच महिन्यांत १४ लाखांची विक्री! वाचा प्रेरणादायी कहाणी

SCROLL FOR NEXT