मुंबई, ता. १७ : शाश्वत विकास आणि लोकसहभागातून झालेल्या परिवर्तनातील प्रयत्नांची दखल घेत, महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या ‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गत पालघर जिल्ह्यातील आदिवासी गाव नावझेला सन्मानित करण्यात आले आहे.
नावझेने सातत्यपूर्ण लोकसहभाग आणि सहयोगात्मक प्रयत्नांतून आरोग्य, पोषण, शिक्षण, जलसंधारण आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या क्षेत्रात मोठी प्रगती केल्याने हा पुरस्कार मिळाला.
गावच्या या विकासप्रवासाला सोसायटी फॉर ह्युमन अँड एन्व्हायर्नमेंटल डेव्हलपमेंट (शेड) सोबत सहयोगाने राबवण्यात येणाऱ्या रोश डायग्नोस्टिक्स इंडियाचा प्रमुख सीएसआर उपक्रम ‘प्रोजेक्ट रोशनी’चे पाठबळ मिळाले आहे. २०१५ पासून या उपक्रमाने महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यातील १,०००हून अधिक लाभार्थी कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
गेल्या १० वर्षांत जवळपास ३० टक्के महिलांच्या हिमोग्लोबिनच्या पातळीत सुधारणा झाली. मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण २५ ते ३० टक्क्यांनी कमी करण्यात मोलाची भूमिका या उपक्रमाने बजावली, असे सरपंच दामोदर लबाड म्हणाले.
प्रत्येक बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आणि पोषणाची जाणीव असणे आवश्यक आहे. अशा अर्थपूर्ण सहयोगामुळे व्यक्तींच्या जीवनात दीर्घकालीन सकारात्मक प्रभाव घडवून आणणे शक्य होते, असे ‘शेड’चे सीईओ राजेंद्र तावडे म्हणाले.
मुंबई : शाश्वत विकासाबद्दल ‘माझी वसुंधरा अभियानां’तर्गत नावझे गावचा सन्मान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.