मुंबई

किल्ले बांधणी स्पर्धेला प्रतिसाद

CD

बालहातांनी साकारले स्वराज्याचे वैभव
महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नेरूळ, ता. १७ (बातमीदार) : दिवाळीत बालगोपाळांकडून अंगणात किल्ले उभारण्याच्या परंपरेला प्रोत्साहन देतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि स्वराज्याची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नवी मुंबई महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित ‘नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धा २०२६-२७’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत शालेय गटातील २६ आणि खुल्या गटातील १२३ अशा एकूण १४९ समूहांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमातून ऐतिहासिक वारशाचे जतन आणि दुर्गसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यासोबतच मुलांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाल्याचे समाधान महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केले.

स्पर्धेतील सहभागी किल्ल्यांचे परीक्षण करण्यासाठी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्सचे फाइन आर्ट कलावंत शिवम घोडजकर आणि प्रशांत धाडवे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. किल्ल्यांची रचना, बांधणीतील बारकावे, कलात्मकता आणि ऐतिहासिक संदर्भ यांचे परीक्षण करण्यात आले. तसेच सहभागी मुलांकडून किल्ल्यांविषयीची माहिती आणि त्यामागील संकल्पना जाणून घेण्यात आली. महापालिकेने या सर्व किल्ल्यांचे छायाचित्रण आणि व्हिडिओ चित्रीकरणही केले आहे.

प्राथमिक फेरीतून शालेय गटातील सहा आणि खुल्या गटातील १९ अशा एकूण २५ किल्ल्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. अंतिम परीक्षणानंतर प्रत्येक गटातील उत्कृष्ट तीन किल्ल्यांना तसेच उत्तेजनार्थ तीन किल्ल्यांना रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी ३० हजार, द्वितीय क्रमांकासाठी २० हजार आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये, तर शालेय गटात अनुक्रमे २० हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय दोन्ही गटांत प्रत्येकी तीन उत्तेजनार्थ पारितोषिके पाच हजार रुपये याप्रमाणे देण्यात येणार आहेत.

महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे, उपसभापती राजू भालचंद्र मढवी आणि समितीच्या सदस्यांनी या स्पर्धेचे आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

MS Dhoni Retire: महेंद्रसिंग धोनीने त्याचा निवृत्तीचा निर्णय CSK ला केव्हा आणि कसा कळवला? म्हणाला, माझं नाव त्यात लिहा...

Amazon: ॲमेझॉनची भारतात 7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना; 2030 पर्यंत चार सौर आणि पवनऊर्जा प्रकल्प उभारणार

उद्या ५ राशींच्या आयुष्यात होणार महत्त्वाचे बदल; आर्थिक निर्णय घेताना सावध राहा!

Success Story: ऑफिसवेअरच्या शोधात सुरू झाला स्वतःचा ब्रँड; नागपूरच्या तरुणीने साडेपाच महिन्यांत १४ लाखांची विक्री! वाचा प्रेरणादायी कहाणी

SCROLL FOR NEXT