मुंबई

१४ लाखांचे तांब्याचे साहित्य चोरणारी टोळी जेरबंद

CD

भिवंडी, ता. १७ (वार्ताहर) : तालुक्यातील गोदाम पट्ट्यात घरफोडी करून १४ लाख ४४ हजार रुपये किमतीचे तांब्याचे साहित्य चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. अवघ्या दोन दिवसांत तपासाची चक्रे फिरवून पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील १४ लाख ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यासाठी वापरलेला टेम्पो हस्तगत करण्यात आला आहे.
नारपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राहनाळ ग्रामपंचायत क्षेत्रातील सद्‍गुरू कम्पाउंड येथील गोदामात ५ ते १२ नोव्हेंबरदरम्यान घरफोडी झाली होती. चोरट्यांनी गोदामाचे शटर तोडून तेथे ठेवलेले तांब्याचे विविध साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने आणि पोलिस निरीक्षक अतुल अडूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. अवघ्या दोन दिवसांत संशयितांचा ठावठिकाणा शोधून पोलिसांनी शौकत ऊर्फ वसीम अकबरअली खान (वय २८), गयासुद्दीन सलाहुद्दीन चौधरी (वय २१), सलमान शाबान अली खान (वय ३३), अंबिया सजाउद्दीन मिर्झा (वय ३२, सर्व रा. कौसा, मुंब्रा) आणि अब्दुल हासिम वदुत खान (वय ३८, रा. उल्हासनगर क्रमांक ५) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर चोरीसाठी वापरलेला टेम्पो आणि १४ लाख ३७ हजार रुपये किमतीचे तांब्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आकाश पवार करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gurnoor Brar: भारताच्या गुरनूर ब्रारला ICC कडून मोठी शिक्षा! वनडेतील भांडण पडलं महागात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Crorepati Family: १५ कोटींची उलाढाल, सुखी कुटुंब, तरीही पत्नी-मुलींसह सन्यास घेण्याचा करोडपती कुटुंबाचा निर्णय

MS Dhoni Retire : महेंद्रसिंग धोनीने '7' चे गणित इथेही गाठले; चेपॉकवर निवृत्तीचे स्वप्न अपूर्ण राहिले, शेवटचा सामना कुठे व केव्हा खेळला?

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

SCROLL FOR NEXT