मुंबई

पुनर्विकासाचे अधिकार सिडकोकडेच द्या!

CD

पुनर्विकासाचे अधिकार सिडकोकडेच द्या!
राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी भरत जाधव यांची मागणी
नेरूळ, ता. १७ (बातमीदार) : सिडकोनिर्मित इमारतींच्या स्वयंपुनर्विकास, पुनर्विकास आणि समूह पुनर्विकास प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप टाळून ती पारदर्शक व सुरळीतपणे पार पडावी, यासाठी पुनर्विकासाला मंजुरी देण्याचे संपूर्ण अधिकार सिडको प्रशासनाकडेच असावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष भरत जाधव यांनी केली आहे. या मागणीसाठी संपूर्ण नवी मुंबईतील सिडकोनिर्मित सोसायट्यांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

पुनर्विकास प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप झाल्यास अनेक प्रकल्प रखडण्याची शक्यता असून, त्याचा थेट फटका सर्वसामान्य रहिवाशांना बसतो. नवी मुंबईसह लगतच्या शहरांमध्ये पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प वर्षानुवर्षे रखडल्याने रहिवाशांना स्वतःच्या घरापासून वंचित राहावे लागले आहे. काही कुटुंबांवर तर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पुनर्विकासाच्या मंजुरीची प्रक्रिया सिडकोच्या अखत्यारीत असणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी नमूद केले.

या वेळी त्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहातील कामकाजावरही टीका केली. सत्ताधारी पक्ष बहुमताच्या जोरावर नियमबाह्य ठराव मंजूर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नगररचनाकार सोमनाथ केकान यांच्याबाबत मंजूर करण्यात आलेला ठराव, तसेच उद्यान, गटार आणि डस्टबिन घोटाळ्यांप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना पाठीशी घातले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. अशा प्रकारच्या राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासकीय निर्णयप्रक्रियेवर परिणाम होत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

सिडकोनिर्मित इमारतींच्या कोणत्याही प्रकारच्या पुनर्विकासाला मंजुरी देण्याचे अधिकार सिडको प्रशासनाकडे देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी सर्व सिडको सोसायट्यांचे पदाधिकारी आणि रहिवाशांनी एकत्र येऊन जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही जाधव यांनी केले. पुनर्विकास प्रक्रियेत पारदर्शकता राहून रहिवाशांचे हित सुरक्षित व्हावे आणि कोणत्याही कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येऊ नये, हा या मोहिमेमागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

MS Dhoni Retire: महेंद्रसिंग धोनीने त्याचा निवृत्तीचा निर्णय CSK ला केव्हा आणि कसा कळवला? म्हणाला, माझं नाव त्यात लिहा...

School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

Amazon: ॲमेझॉनची भारतात 7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना; 2030 पर्यंत चार सौर आणि पवनऊर्जा प्रकल्प उभारणार

SCROLL FOR NEXT