सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : भांडवली बाजारातील भरघोस नफा, ऑनलाइन टास्कमधून कमिशन आणि घरबसल्या ऑनलाइन व्यवसायाचे प्रलोभन दाखवून सायबर चोरट्यांनी ठाण्यातील तिघांना तब्बल एक कोटी २३ लाखांचा गंडा घातला आहे. व्हॉट्सॲप ग्रुप, डेटिंग ॲप आणि समाजमाध्यमाच्या माध्यमातून ओळख वाढवून बनावट ट्रेडिंग ॲप आणि संकेतस्थळाद्वारे ही फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे, खात्यात कोट्यवधींचा नफा दाखवून पैसे काढण्यासाठी लाखोंची अतिरिक्त मागणी करण्यात आली.
घोडबंदर रोडवरील ४५ वर्षीय नोकरदाराला भांडवली बाजारातील गुंतवणुकीतून आठ कोटी ४२ लाखांचा नफा झाल्याचे भासवण्यात आले. इक्विरस कॅपिटलच्या नावाने बनावट ॲप वापरून त्यांच्याकडून एक कोटी चार लाख रुपये उकळण्यात आले. तीन कोटी रुपये काढण्यासाठी ४५ लाखांचे कमिशन मागितल्यानंतर फसवणूक उघड झाली. दुसऱ्या घटनेत डेटिंग ॲपवरून ओळख झालेल्या महिलेने ऑनलाइन रेटिंग आणि रिव्ह्यूच्या टास्कचे प्रलोभन दाखवून विक्री व्यवस्थापकाला १७.९६ लाखांचा गंडा घातला. पैसे काढण्यासाठी १२ लाखांच्या टॅक्सची मागणी करण्यात आली. ब्रह्मांडमधील नोकरदाराला ऑनलाइन स्टोअरच्या व्यवसायात २० टक्के कमिशनचे प्रलोभन दाखवून ९६ हजारांची फसवणूक करण्यात आली. जमा रक्कम मिळवण्यासाठी २६ लाखांच्या आयकराची मागणी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.