मुंबई

दुष्काळग्रस्त श्रीवर्धन तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा दिलासा

CD

शुल्कमाफीला अटींचा अडसर
प्रशासनाकडे निकष शिथिल करण्याची मागणी
श्रीवर्धन, ता. १७ (वार्ताहर) ः दुष्काळग्रस्त श्रीवर्धन तालुक्यातील विद्यार्थ्यांना राज्य शासनाने परीक्षा शुल्कमाफी जाहीर करून मोठा दिलासा दिला, परंतु या सवलतींसाठी लादलेल्या जाचक अटींमुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शासन निर्णयातील तांत्रिक त्रुटी आणि कडक निकषांमुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
निर्णयानुसार, राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील अडीच लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचेही परीक्षा शुल्क माफ केले आहे, मात्र श्रीवर्धन तालुक्यातील नेमक्या किती विद्यार्थ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला, याची अधिकृत आकडेवारी अद्याप स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेली नाही. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ३ नोव्हेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार शुल्कमाफीसाठी कडक नियम लागू केले आहेत. एकीकडे दुष्काळ जाहीर करून मदतीची घोषणा करायची आणि दुसरीकडे जाचक नियम लादून विद्यार्थ्यांना योजनेपासून दूर ठेवायचे, अशा दुटप्पी धोरणाविरोधात तालुक्यात नाराजी पसरली आहे. प्रशासनाने श्रीवर्धनमधील लाभार्थ्यांची नेमकी आकडेवारी तत्काळ जाहीर करावी आणि स्थलांतरित पालकांच्या अटींसह इतर जाचक निकष शिथिल करावेत, अशी जोरदार मागणी पालक व विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.

योजनेतील प्रमुख जाचक अटी आणि अडचणी :
१ ज्या विद्यार्थ्यांचे पालक नोकरी किंवा व्यवसायानिमित्त शहरात राहतात आणि केवळ गावाकडे त्यांच्या नावावर शेतजमीन आहे, अशा विद्यार्थ्यांना या सवलतीतून थेट अपात्र ठरवण्यात आले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील अनेक कुटुंबे उपजीविकेसाठी मुंबई आणि पुण्यात स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे या अटीचा सर्वाधिक फटका तालुक्यातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार आहे.
२ याशिवाय, बहिःस्थ आणि पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे. तसेच, महाडीबीटी पोर्टलवरील माहिती आणि ७/१२ उताऱ्यांच्या काटेकोर पडताळणीची जबाबदारी महाविद्यालयांवर टाकल्याने प्रक्रियेत मोठी दिरंगाई होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

MS Dhoni Retire: महेंद्रसिंग धोनीने त्याचा निवृत्तीचा निर्णय CSK ला केव्हा आणि कसा कळवला? म्हणाला, माझं नाव त्यात लिहा...

School Admission: मोठी बातमी! नर्सरी-केजी प्रवेशावेळी डोनेशन मागितल्यास शाळांवर कारवाई; मुलाखती अन् चाचण्याही बंद; वाचा नवे नियम

Amazon: ॲमेझॉनची भारतात 7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची योजना; 2030 पर्यंत चार सौर आणि पवनऊर्जा प्रकल्प उभारणार

SCROLL FOR NEXT