कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. कचोरे, टिटवाळा आणि मांडा या तीन ठिकाणी कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले आहे. या तिन्ही ठिकाणचे भूखंड कब्रस्तानासाठी आरक्षित असून, त्यावरील कथित अवैध बांधकामांमुळे हा प्रश्न प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.
मोहने येथील एका महिलेच्या निधनानंतर दफनविधीसाठी जागा उपलब्ध न झाल्याने निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला गोयल, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी, नगरसेवक राहुल कोट, उमेश बोरगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित म्हात्रे, नवीन सिंग, शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे शकील खान आणि मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी सरफूद्दीन कर्ते यांसह अनेक जण उपस्थित होते.
बैठकीत मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र आणि पुरेशा कब्रस्तानांची व्यवस्था करण्याची मागणी प्रतिनिधींनी मांडली. कचोरे, टिटवाळा आणि मांडा येथील कब्रस्तानासाठी आरक्षित असलेले भूखंड महापालिकेने ताब्यात घेऊन ते समाजाला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. याची दखल घेत आयुक्त गोयल यांनी संबंधित जागांबाबत तातडीने नियोजन करून कब्रस्तानाची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.