मुंबई

भांजेवाडीत ‘एसआरए’ला रहिवाशांचा विरोध

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : रहिवाशांचा विरोध असतानाही नौपाड्यातील भांजेवाडी येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) योजना राबविण्यासाठी मालक आणि विकसकाकडून दबाव टाकला जात असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. याप्रकरणी रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी एसआरएच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विकसकाने सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आणि प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.

खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित ‘जनसेवकाचा जनसंवाद’ या कार्यक्रमात भांजेवाडीतील रहिवाशांनी आपली व्यथा मांडली. येथील मालकाने एका विकसकाला ना हरकत प्रमाणपत्र दिले असून, त्याआधारे विकसकाने एसआरए विभागाकडे कागदपत्रे सादर करून पुनर्वसन योजना राबविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, मात्र भांजेवाडीतील सुमारे ९० टक्के नागरिकांचा या योजनेला विरोध असल्याचा दावा रहिवाशांनी केला, तरीही विकसकाकडून दबावतंत्राचा वापर करून योजना पुढे रेटण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार त्यांनी केली. याची गंभीर दखल घेत केळकर यांनी रहिवाशांच्या संमतीशिवाय त्यांच्यावर योजना लादता येणार नसल्याचे स्पष्ट करत अधिकाऱ्यांना कागदपत्रांची तपासणी करण्यास सांगितले.

प्लॉटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक
शहापूर आणि मुरबाड परिसरात प्लॉटिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचा मुद्दाही जनसंवादात उपस्थित झाला. शहापूरमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी विकासकाकडून प्लॉट नावावर केला जात नसल्याची तसेच गुंतवलेले पैसेही परत मिळत नसल्याची तक्रार केली. यानंतर केळकर यांनी संबंधित विकसकाशी थेट संपर्क साधला. गुंतवणूकदारांचे पैसे एका महिन्यात एकरकमी परत करण्याचे आश्वासन विकसकाने दिल्याचे त्यांनी सांगितले.

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर
चेंदणी कोळीवाड्यातील रवी उदय सोसायटीच्या रहिवाशांनीही आपल्या परिसरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न मांडला. संकुलात निवृत्त शासकीय अधिकारी वास्तव्यास असूनही गेल्या तीन वर्षांपासून अतिक्रमणावर कारवाई झालेली नसल्याची तक्रार त्यांनी केली. याप्रकरणी केळकर यांनी तहसीलदारांशी संपर्क साधला. संबंधित अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL मधील निवृत्तीनंतर शेअर बाजारात एन्ट्री; धोनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा लवकरच येणार IPO

Cabinet Decision: शिक्षण क्षेत्रापासून न्यायालयापर्यंत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ धडाकेबाज निर्णय

Gurnoor Brar: भारताच्या गुरनूर ब्रारला ICC कडून मोठी शिक्षा! वनडेतील भांडण पडलं महागात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

SCROLL FOR NEXT