मुंबई

दहशतवादी संबंधाच्या आरोपातून ३५ लाखांवर डल्ला!

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : कधी ईडीची नोटीस, तर कधी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी अशा पद्धतीने ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात ओढून ३५ लाख ५० हजारांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य सायबर चोरट्यांचा मुंब्रा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. केवळ मोबाईल क्रमांक आणि बँक खात्याच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करीत पोलिसांनी आंध्र प्रदेश आणि गुजरातमधून दोघांना अटक केली. विशेष म्हणजे, फसवणुकीची संपूर्ण रक्कम न्यायालयाच्या आदेशाने ज्येष्ठाला परत मिळवून दिली आहे, अशी माहिती ठाणे शहर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. यातील तमिळनाडू येथील मुख्य आरोपीच्या मागावर पथक असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

दिवा पूर्व येथे राहणारे राजेंद्रकुमार नायक (वय ७१) यांना १६ सप्टेंबरपासून काही व्यक्तींनी व्हॉट्सॲप कॉल करण्यास सुरुवात केली. त्यांच्या आधार कार्डवर खासगी बँकेत खाते उघडण्यात आले असून, त्याचा वापर मनी लॉन्ड्रिंगसाठी झाला आहे. चार दहशतवाद्यांशी त्यांचे नाव जोडले गेले असून, ९६ कोटींच्या घोटाळ्यातील अडीच कोटी रुपये त्यांच्या खात्यात जमा झाल्याचा दावा करण्यात आला. ईडी, आरबीआय, सीबीआय आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नावाने बनावट नोटिसा पाठवून चाेरट्यांनी नायक यांचा विश्वास संपादन केला.

पोलिसांकडे गेल्यास कुटुंबीयांना जीवे मारले जाईल, अशी धमकी देत त्यांना तब्बल सहा तास व्हिडिओ कॉलवर ठेवण्यात आले. दर तासाला संपर्क साधून खोलीबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. या मानसिक दबावाखाली आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर नायक यांनी ३५ लाख ५० हजार रुपये जमा केले. फसवणूक लक्षात आल्यानंतर त्यांनी २६ सप्टेंबरला मुंब्रा पोलिस ठाण्यात धाव घेतली.

उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. दरम्यान, फसवणुकीची रक्कम जमा झालेल्या बँक खात्याचे व्यवहार तातडीने गोठवण्यात आले. पोलिस पथकाने आंध्र प्रदेशात धडक देत, साक्षावली हुसेनपिरा शेख (वय ३३) याला ३ नोव्हेंबरला अटक केली. त्यानंतर गुजरातमधील बडोदा येथून समीर इकबाल डबुरीवाला (२१) याला ७ नोव्हेंबरला बेड्या ठोकण्यात आल्या. या गुन्ह्यातील अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Retire : महेंद्रसिंग धोनीने '7' चे गणित इथेही गाठले; चेपॉकवर निवृत्तीचे स्वप्न अपूर्ण राहिले, शेवटचा सामना कुठे व केव्हा खेळला?

यष्टिंमागचा 'योद्धा'; जो सामन्याला द्यायचा सहज कलाटणी, नाव सांगायची गरज नाही...

Cyclone Akvan Update: 145 किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ ‘अकवान’; 'या' 13 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

Latest Marathi News Live Update : अमित शाहांवर टीका करणारे थापाडे, एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

IPL 2027: शमी चा संघ बदलला! लखनौ-राजस्थान मध्ये मोठी ट्रेड, कोणासोबत झाली अदला बदली

SCROLL FOR NEXT