मुंबई

येऊरच्या जंगलात अनधिकृत बांधकामे

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : येऊरच्या निसर्गरम्य परिसरात पर्यटन आणि विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अनधिकृत कारभाराला लगाम घालण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा दावा करत काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. आदिवासींच्या जमिनींचे झालेले कथित बेकायदा हस्तांतरण, जंगल परिसरातील वाढती बांधकामे आणि वन्यजीवांच्या अधिवासावर होणारे अतिक्रमण या प्रश्नांवर काँग्रेसने महापालिका मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. येत्या १५ दिवसांत संबंधित यंत्रणांनी कारवाई केली नाही, तर पुढील महिन्यात बेमुदत उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा माजी शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीलगत असलेल्या येऊर परिसरातील परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. १७) हे आंदोलन करण्यात आले. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपोषणात शहराध्यक्ष राहुल पिंगळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. येऊरमधील जमिनींच्या मालकी हक्कांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले. परिसरातील तब्बल ८० टक्के जमिनींचे सातबारा उतारे खासगी व्यक्तींच्या नावावर झाल्याचा, तर केवळ २० टक्के जमिनी आदिवासींच्या नावावर शिल्लक असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. आदिवासींच्या जमिनींचे हस्तांतरण कोणत्या आधारे झाले, याची महसूल विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. जंगल परिसरात मोठमोठे बंगले उभारले जात असून, दुरुस्तीच्या परवानगीचा आधार घेऊन तीन ते चार मजली बांधकामे केली जात असल्याचा दावाही करण्यात आला.

दरम्यान, या वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे येऊरमधील पर्यावरणीय समतोल बिघडत असल्याची चिंता काँग्रेसने व्यक्त केली. वृक्षतोड, कूपनलिका, संरक्षक भिंती आणि अनधिकृत बांधकामांमुळे वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारावर मर्यादा येत आहेत. विजेच्या धक्क्याने वन्यजीवांचा मृत्यू होण्याच्या घटनांनाही आळा घालण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. येऊरमधील प्रश्नांबाबत मुख्यमंत्री, वन विभाग, नगरविकास विभाग, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांकडे वारंवार निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

फलकांच्या सुरक्षेचाही प्रश्न
या आंदोलनात शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांचा विषयही मांडण्यात आला. फलकांची उंची ४० फुटांपर्यंत आणि आकार ३० बाय ४० फुटांपर्यंत मर्यादित ठेवावा. उड्डाणपूल तसेच मोकळ्या जागांमध्ये फलक उभारण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. असुरक्षित फलकांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, असेही आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gurnoor Brar: भारताच्या गुरनूर ब्रारला ICC कडून मोठी शिक्षा! वनडेतील भांडण पडलं महागात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Crorepati Family: १५ कोटींची उलाढाल, सुखी कुटुंब, तरीही पत्नी-मुलींसह सन्यास घेण्याचा करोडपती कुटुंबाचा निर्णय

MS Dhoni Retire : महेंद्रसिंग धोनीने '7' चे गणित इथेही गाठले; चेपॉकवर निवृत्तीचे स्वप्न अपूर्ण राहिले, शेवटचा सामना कुठे व केव्हा खेळला?

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

SCROLL FOR NEXT