पेणमध्ये थंडीचा जोर वाढला
स्वेटर, जॅकेटची खरेदी वाढली; बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी
पेण, ता. १६ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांची खरेदी सुरू केली आहे. बाजारपेठेत स्वेटर, जॅकेट, कानटोप्या, हातमोजे, पायमोजे यांसह ब्लँकेट्सना मागणी वाढली असून, विविध प्रकारच्या कपड्यांनी दुकाने सजली आहेत.
यंदा सुरुवातीपासूनच थंडीची तीव्रता जाणवू लागल्याने दुकानदारांनी उबदार कपड्यांचा मोठा साठा उपलब्ध केला आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांसाठी विविध प्रकारचे स्वेटर, जॅकेट आणि इतर उबदार वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. विशेषतः लहान मुलांसाठी आकर्षक रंगांचे, मऊ कापडाचे आणि कार्टूनची चित्रे असलेले स्वेटर पालकांचे लक्ष वेधून घेत आहेत. महिलांसाठीही विविध डिझाइनचे स्वेटर उपलब्ध आहेत. थंडी वाढल्याने या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ वाढली आहे.
ब्लँकेट्सच्या खरेदीलाही पसंती
थंडीपासून बचावासाठी ब्लँकेट्स खरेदी करण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. बाजारात विविध आकार, रंग आणि प्रकारांतील ब्लँकेट्स उपलब्ध आहेत. त्यांचे दर साधारणतः ५०० रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत असून, त्यापुढील किमतींचे पर्यायही आहेत. मागील वर्षी थंडीचा जोर तुलनेने कमी असल्याने उबदार कपड्यांची आवक मर्यादित होती. यंदा मात्र थंडी लवकर जाणवू लागल्याने व्यापाऱ्यांनी विविध प्रकारच्या वस्तूंचा साठा वाढविला आहे.
पेणमधील व्यापारी कांतीलाल संगम यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढल्याने स्वेटर, जॅकेट आणि ब्लँकेट्सच्या खरेदीला वेग आला आहे. ग्राहकांकडून विविध प्रकारच्या उबदार वस्तूंना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.