पेण बाजारपेठेत अतिक्रमणाचा विळखा
अग्निशमन दलाच्या गाडीलाही मार्ग मिळेना
पेण, ता. १७ (वार्ताहर) : पेण शहरातील बाजारपेठेत दुकानदारांकडून रस्ते आणि गटारांवर अतिक्रमण वाढत असल्याने वाहतुकीचा मार्ग अरुंद झाला आहे. त्यामुळे आग किंवा अन्य दुर्घटना घडल्यास अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना घटनास्थळी पोहोचणे कठीण होण्याची शक्यता आहे. ८ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या रात्री उत्कर्ष नगरमधील अपार्टमेंटला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर बाजारपेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या आगीत दोन फ्लॅट पूर्णपणे जळाले होते. आग विझवण्यासाठी पेण नगर परिषद आणि जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, मात्र अरुंद मार्गामुळे आग लागलेल्या ठिकाणी पोहोचताना अडचणी आल्या. अखेर दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. या घटनेमुळे बाजारपेठेतील रस्ते मोकळे ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
दुकानदारांना सूचना देणार
मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी बाजारपेठेतील दुकानदारांना रस्त्यावर अतिक्रमण न करण्याच्या सूचना देण्यात येणार असल्याचे सांगितले. अग्निशमन दलाची गाडी सहज जाऊ शकेल एवढा रस्ता मोकळा ठेवण्याचे आदेश काढण्यात येतील. तसेच वाहतूक पोलिसांशी चर्चा करून गर्दीच्या ठिकाणी वाहनांवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.