मुंबई

आईच्या गळ्यावर वार केल्यानंतर मुलाचाही आत्महत्येचा प्रयत्न!

CD

आईच्या गळ्यावर वार केल्यावर
मुलाचाही आत्महत्येचा प्रयत्न!
कौटुंबिक ताणतणावातून वाद; मायलेकाची प्रकृती गंभीर

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : कौटुंबिक तणावातून ७० वर्षीय आईच्या गळ्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करून तिच्या हत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्या मुलानेही स्वतःच्या गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईतील वाशी परिसरात समोर आली आहे. या घटनेत मायलेक दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हिरावती महेश घोडाम (७०) असे जखमी आईचे नाव असून, विनय महेश घोडाम (४२) असे मुलाचे नाव आहे. सोमवारी (ता. १६) सकाळी १०च्या सुमारास पूजा पंजाब हॉटेलजवळ, शिळ-महापे रस्त्यावरील परिसरात विनय याने कौटुंबिक ताणतणावातून आई हिरावती यांच्या गळ्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर विनय याने वाशी परिसरात जाऊन स्वतःच्या गळ्यावर वार करीत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विनय याच्या कुटुंबात यापूर्वीही आत्महत्येची घटना घडली होती. त्याच्या भावाने यापूर्वी आत्महत्या केली होती. तसेच विनयही आत्महत्या करण्याची भीती कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आली होती. अखेर त्यानेही स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे.

याप्रकरणी जखमी महिलेच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून शिळ-डायघर पोलिस ठाण्यात विनय घोडाम याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१) अन्वये हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मायलेक दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू अशी माहिती पोलिस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलिस उपानिरीक्षक नागेश शिरसकर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: टाटा समूहात खळबळ! रतन टाटा यांचे सख्खे भाऊ जिमी टाटा यांचे नोएल टाटांवर गंभीर आरोप; म्हणाले...

IPL Retaintion झालं, आता लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे अन् खेळाडूंची जागा शिल्लक? पाहा यादी

Pimpri Cyber Police : सायबर गुन्हेगारांना १२ हजार बनावट सिमकार्डचा पुरवठा; पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई

सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण! दहा दिवसांत सोने ७,४००, तर चांदी १५,९०० रुपयांनी स्वस्त

Pimpri Chinchwad politics : पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या सात स्वीकृत सदस्यांची निवड कशी होणार? विधानसभानिहाय सूत्राची चर्चा

SCROLL FOR NEXT